ETV Bharat / state

केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीत आवाज उठवणार - असदुद्दीन ओवेसी - खासदार असदुद्दीन ओवेसी जळगाव प्रचारसभा

एमआयएम फक्त मुस्लिमांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत आपण जातीपातीचे राजकारण करत नाही. धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतून पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार विवेक ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला भर उन्हात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

खासदार असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Oct 14, 2019, 10:14 AM IST

Updated : Oct 14, 2019, 10:31 AM IST

जळगाव - केळीचे विक्रमी उत्पादन घेण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असताना केळी उत्पादकांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी व केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ट करणे हा यापुढे एमआयएम पक्षाचा अजेंडा असेल. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडणार, असे आश्वासन 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जळगाव येथे प्रचारसभा

हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी

रावेर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारासाठी रविवारी फैजपूर येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्याने मुस्लीम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुस्लीम बांधवांच्या मतांच्या जोरावर पदे भूषवणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीए दर कमी होत आहे. महागाई वाढत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे व्यापारी, शेतकरी त्रस्त आहेत. गरीब मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.

हेही वाचा - नाना पटोलेंच्या मतदारसंघात मोदींची सभा; लोक म्हणतात...

एमआयएम जातीपातीचे राजकारण करत नाही-

एमआयएम फक्त मुस्लिमांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत आपण जातीपातीचे राजकारण करत नाही. धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतून पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार विवेक ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला भर उन्हात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही - अण्णासाहेब डांगे

Intro:जळगाव
केळीचे विक्रमी उत्पादन घेण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असताना केळी उत्पादकांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी व केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ट करणे हा यापुढे एमआयएम पक्षाचा अजेंडा राहील. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडणार, असे आश्वासन 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन आेवेसी यांनी दिले.Body:रावेर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारासाठी रविवारी फैजपूर येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारामुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुस्लीम बांधवांच्या मतांच्या जोरावर पदे भूषवणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. शेतकरी आत्महत्या करीत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीए दर कमी होत आहे. महागाई वाढत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे व्यापारी, शेतकरी त्रस्त आहे. गरीब मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.Conclusion:एमआयएम जातीपातीचे राजकारण करीत नाही-

एमआयएम फक्त मुस्लिमांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत आपण जातीपातीचे राजकारण करीत नाही. धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतून पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार विवेक ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला भर उन्हात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
Last Updated : Oct 14, 2019, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.