ETV Bharat / state

पायपीट करत घराकडे निघालेल्या परप्रांतीय महिलेची रस्त्यातच प्रसुती.. दिला गोंडस बाळाला जन्म

साडेतीनशे किलोमीटर अंतर चालून झाल्यानंतर या प्रवासादरम्यान, जळगावात येताच इशरतला प्रसवकळा सुरू झाल्या. तिच्या पतीने महामार्गावरील शासकीय आयटीआयजवळ असलेल्या काही लोकांना याबाबतची माहिती दिली.

migrant woman gave birth to child on road

author img

By

Published : May 8, 2020, 11:57 AM IST

जळगाव - लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद पडल्याने अनेक मजूर, कामगार मिळेल त्या साधनाद्वारे किंवा पायपीट करत आपल्या घराकडे परतत आहेत. असेच एक परप्रांतीय कुटुंब सुरतहून उत्तरप्रदेशात घरी जाण्यासाठी निघाले होते. साडेतीनशे किलोमीटर अंतर पायपीट करून शुक्रवारी जळगावात दाखल झाल्यानंतर या कुटुंबातील गरोदर महिलेने रस्त्यावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतिवेळी काही स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने आईसह बाळाचे प्राण वाचले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच रेल्वेसेवा, बस व खासगी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महानगरांमध्ये कामधंद्यासाठी गेलेले मजूर व कामगार रेल्वे ट्रॅक, सायकल यासह रस्त्यानेच पायी आपल्या घराच्या दिशेने निघाले आहेत.

उत्तरप्रदेशातील अमेठीतील ईठागोरीगंज या गावातील नूर मोहम्मद त्याची पत्नी इशरत मोहम्मद नूर व तीन वर्षाचा मुलगा मोहम्मद नुमान हे पायीच आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले होते. हा परिवार सुरत येथील लूम मार्केटमध्ये कपडे विणण्याचे काम करत होता. नूर मोहम्मदची पत्नी इरशत ही 9 महिन्यांची गर्भवती होती. मात्र, कोरोनामुळे लॉक डाऊन जाहीर झाल्याने हे कुटुंब पायीच आपल्या मूळ गावी निघाले होते.

migrant woman gave birth to child on road
पायपीट करत घराकडे निघालेल्या परप्रांतीय महिलेने जळगावात रस्त्यावरच दिला गोंडस बाळाला जन्म

साडेतीनशे किलोमीटर अंतर चालून झाल्यानंतर या प्रवासादरम्यान, जळगावात येताच इशरतला प्रसवकळा सुरू झाल्या. तिच्या पतीने महामार्गावरील शासकीय आयटीआयजवळ असलेल्या काही लोकांना याबाबतची माहिती दिली. या नागरिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कवी कासार यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर कवी कासार यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घटनास्थळी धाव घेतली. प्रसवकळा असह्य होत असल्याने इशरत महामार्गाच्या बाजूला असलेल्या झोपड्यांजवळ पडलेली होती. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचताच तिला रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. नंतर रुग्णवाहिकेत तिची प्रसूती झाली.

अन्यथा घडला असता मोठा अनर्थ-

इशरतने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. यावेळी कवी कासार यांनी तिला तात्काळ मातृसेवा हॉस्पिटलमध्ये नेले. याठिकाणी डॉ. विलास भोळे यांनी प्राथमिक स्तरावर त्या महिलेची व बाळाची नाळ कापली. परंतु, तिची प्रकृती बिकट होत असल्याने त्यांनी तात्काळ तिला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. कासार यांनी तात्काळ तिला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने इशरत आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले. या घटनेनंतर नूर मोहम्मद यांनी कासार यांचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.