ETV Bharat / state

लाखो रुपयांची औषधी आढळली नाल्यात; जळगावच्या कुसुंब्याची घटना - medicine found in drainage line

नाल्यात मोठ्या प्रमाणात या औषधी विखुरलेल्या असल्यामुळे गावात खळबळ उडाली होती. नागरिकांनी नाल्याच्या परिसरात गर्दी केली. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला आहे. या प्रकरणी इम्रान सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाल्यात फेकलेली औषधी
नाल्यात फेकलेली औषधी
author img

By

Published : Mar 3, 2020, 2:13 AM IST

जळगाव - शहरातील एमआयडीसी परिसरातील कुसुंबा गावालगत असलेल्या लाख्याच्या नाल्यात अज्ञात व्यक्तीने लाखो रुपयांची औषधींची खोके फेकल्याचे सोमवारी उघडकीस आले. या औषधींमुळे नागरिक, प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाल्यात फेकलेली औषधी

कुसुंब्याचे पाेलीस पाटील राधेशाम चौधरी यांना या संदर्भात मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी माहिती दिली होती. यानंतर चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना माहिती कळवली. शिरसाठ यांच्या पथकाने कुसुंबा येथे धाव घेऊन औषधी ताब्यात घेतली. यात झेटीन फार्मा प्रा.लि. ए ४०४, रहेमत महेल, कुसा मार्केटजवळ, मुंब्रा, ठाणे या कंपनीच्या क्लायझेट सीरप, टी युसाकी टी सीरप, आरजी लीअर सॅचेट लेमन फ्लेवर या कंपनींचे पाऊच, औषधाच्या बाटल्या हाेत्या. तसेच काही खोक्यांमध्ये युनि प्युअर बायोटेक, २३० लाईन फ्लोअर, एम मार्केट, मनीमाजरा, चंडीगड या कंपनीचे मल्टी प्युअर सीरप या औषधाच्या बाटल्या आढळल्या आहेत. यातील काही औषधींची एक्सपायरी डेट उलटली आहे. तर काही अजून एक्सपायर झालेल्या नाहीत.

हेही वाचा - कांदे निर्यातीला १५ मार्चपासून केंद्र सरकारची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.