जळगाव - जिल्ह्यातील भडगाव येथील टोणगाव भागातील रहिवासी सैन्य दलाचे जवान निलेश रामभाऊ सोनवणे (वय 30) यांना 10 जुलै रोजी लेह-लडाखमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज (मंगळवार) त्यांच्या पार्थिवावर मूळगावी भडगावला अंत्यसंस्कार होणार आहेत. निलेश यांचा गेल्या महिन्यात वाढदिवस होता. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. बर्फाचा केकही कापला. एकमेकांना हा केक भरवला. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज निलेश आपल्यात नाहीत. परंतु त्यांचा हा भावपूर्ण व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावत आहेत.
VIDEO: शहीद जवान निलेश सोनवणे यांचा सियाचीनमधील 'तो' हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल - जळगाव शहीद जवान
निलेश यांचा गेल्या महिन्यात वाढदिवस होता. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. बर्फाचा केकही कापला. एकमेकांना हा केक भरवला. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज निलेश आपल्यात नाहीत. परंतु त्यांचा हा भावपूर्ण व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावत आहेत.