ETV Bharat / state

'महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रावर अन्याय'

author img

By

Published : Mar 7, 2020, 1:56 PM IST

महाविकासआघाडी सरकारचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे. त्यातही या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

bjp leader eknath khadase
एकनाथ खडसे

जळगाव - शुक्रवारी राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'महाविकासआघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्रासाठी काहीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी निराशाजनक आणि अन्याय करणारा आहे, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया...

हेही वाचा... VIDEO : महा'अर्थ' संकल्पाचे संपूर्ण विश्लेषण

एकनाथ खडसे हे शनिवारी मुक्ताईनगरात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. 'राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा साडेनऊ हजार कोटी रुपये तुटीचा आहे. ही तूट कशी भरून निघेल, याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. पुढे जाऊन ही तूट वाढणार आहे. कोणत्याही प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प हा राज्याच्या दृष्टीने हिताचा नसतो' असे खडसे यांनी म्हटले आहे.

'अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीतरी ठोस पॅकेज जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणतेही पॅकेज सरकारने दिले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प उत्तर महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला आहे. उत्तर महाराष्ट्रात आज अनेक रस्त्यांची कामे, सिंचन प्रकल्प, पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली आहेत. तीर्थक्षेत्र विकासाच्या बाजूने देखील घोषणा नाही. अर्थसंकल्पात त्यासाठी उपाययोजना होण्याची गरज होती. पण सरकारकडून निराशा झाली' असे खडसेंनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... 'सर्व घटकांना समाधान मिळेल असा अर्थसंकल्प'

फडणवीसांच्या कामाचे केले कौतूक...

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील संबंधात सध्या कटुता आल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, फडणवीसांच्या विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेबाबत बोलताना खडसेंनी फडणवीसांच्या कामाचे कौतुक केले. राज्याच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी भाजपवर यापूर्वीही आली आहे. विधानसभा सभागृहात 5 वर्षे भाजपच्या वतीने आपण देखील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यावेळी चुकीच्या निर्णयांवर सरकारला धारेवर धरणे, सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. अलीकडे विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी आपले मत मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.