ETV Bharat / state

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सत्तेचा दुरुपयोग, भाजपचा गंभीर आरोप - mahavikas aghadi abuse power Bank elections

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने राजकारण तापले आहे.जाणीवपूर्वक भाजपच्या उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या. त्या हरकतींवर कायदेशीररित्या उत्तर देऊनही अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग करून स्वार्थापोटी महाविकास आघाडीने घात केला आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केला.

jalgaon District Bank elections bjp accusation
जळगाव जिल्हा बँक निवडणूक भाजप आरोप
author img

By

Published : Oct 21, 2021, 9:06 PM IST

जळगाव - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने राजकारण तापले आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह इतरांचे अर्ज बाद झाल्याने गुरुवारी दुपारी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्यात आली. जाणीवपूर्वक भाजपच्या उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या. त्या हरकतींवर कायदेशीररित्या उत्तर देऊनही अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग करून स्वार्थापोटी महाविकास आघाडीने घात केला आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केला.

माहिती देताना भाजप नेते आणि बाद झालेले उमेदावार

हेही वाचा - धक्कादायक : जळगावात अतिक्रमण कारवाई सुरू असताना पोलिसांना जबर मारहाण

काहीही कारण सांगून भाजपचे अर्ज केले बाद - सुरेश भोळे

महाविकास आघाडीने सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून भाजपसोबत युती करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी नकार दिला. तुम्हाला निवडणूक लढवायचीच होती तर युती करण्यास संमती दर्शवत बैठकीला का उपस्थित राहिले, जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. मात्र, या ठिकाणी सत्ताधारी केवळ आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपच्या उमेदवारांचे अर्ज काहीही कारण सांगून बाद केले आहेत. याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले.

अधिकाऱ्याने ५० हजारांची लाच मागितल्याचा माधुरी अत्तरदेंचा आरोप

हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर उमेदवाराला आपल्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर अभिसाक्षी स्वाक्षरी करावी लागते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही स्वाक्षरी न करताच फॉर्म स्वीकारला. स्वाक्षरी नसल्याच्या कारणास्तव त्यानंतर अर्ज बाद केला. निवडणूक निर्णय अधिकारी बिडवाई यांनी आपल्या पतीकडून अर्ज वैध करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली, असा आरोप भाजपच्या उमेदवार माधुरी अत्तरदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक कार्यालय बेकायदेशीर - स्मिता वाघ

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतरत्र ठिकाणी असायला हवे होते. परंतु, सत्तेचा दुरुपयोग करत महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी निवडणूक कार्यालय हे जिल्हा बँकेतील मॅनेजरच्या कॅबिनमध्ये तयार केले. या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्याचा आरोप माजी आमदार स्मिता वाघ यांनी केला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन -

अर्ज बाद झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी गुरुवारी दुपारी जिल्हा बँकेतील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ, माधुरी अत्तरदे, उमेदवार भारती चौधरी यांचे पती नारायण चौधरी, तसेच मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज बाद झालेले नाना पाटील यांनी हे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संतोष बिडवाई हे स्वत: खुलासा करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनातील संपूर्ण कामकाज काही वेळेसाठी ठप्प झाले होते.

आरोपांमध्ये तथ्य नाही - संतोष बिडवाई

माधुरी अत्तरदे यांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी नव्हती. ती स्वाक्षरी आवश्यक असते, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्व उमेदवारांना संधी देण्यात आली होती. तसेच संपूर्ण कामकाज हे व्हिडिओ चित्रणाद्वारे करण्यात आले. त्यामुळे, कोणाच्या आरोपात काहीही तथ्य नाही. पक्षविरीहीत व पारदर्शकपणे संपूर्ण कामकाज झाले आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिले.

जी.एम. फाउंडेशनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला 'यांची' होती उपस्थिती

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद केल्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी जीएम फाऊंडेशनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, चंद्रशेखर अत्तरदे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.

हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रक्षा खडसेंसह स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.