जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, नुकत्याच विधान परिषददेत विजय झालेले आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतरच रात्रीतून सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड ( Eknath Shinde rebellion ) पुकारले. त्यांच्यासोबत सेनेतून तब्बल 50 ( MLAs split ) आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेच्या विजयानंतर एकनाथ खडसे हे पहिल्यांदाच त्यांच्या मुक्ताईनगर येथील मतदार संघात आले. त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाली.
एकनाथ खडसे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तब्बल तीन वर्षानंतर खडसेंना आमदारकी मिळालेली आहे. याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर एकनाथ खडसेंना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणे टाळले आहे.