जळगाव - गेल्या 21 ऑक्टोबरला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी राज्यात 60.46 टक्के मतदान झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी मतदानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. 2014 च्या निवडणुकीत 63 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. तर, यावेळी 58 टक्के मतदान झाले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर 3 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, 2014 नंतर आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भाजपने जिल्ह्यातील वाट्याला येणाऱ्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने चुरस निर्माण झाली. आज (गुरुवारी) मतमोजणी होत आहे. तर जिल्ह्यातील सत्तेची चावी मतदार कुणाच्या हातात देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगाव विधानसभा निवडणूक 2019 निकाल - विजयी उमेदवार
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
चोपडा | लता सोनवणे (शिवसेना) | जगदीश वळवी (राष्ट्रवादी) | लता सोनवणे (शिवसेना) |
रावेर | हरिभाऊ जावळे (भाजप) | शिरीष चौधरी (काँग्रेस) | शिरीष चौधरी (काँग्रेस) |
पाचोरा | किशोर पाटील (शिवसेना) | | किशोर पाटील (शिवसेना) |
चाळीसगाव | | राजीव देशमुख (राष्ट्रवादी) | मंगेश चव्हाण (भाजप) |
मुक्ताईनगर | रोहिणी खडसे (भाजप) | | चंद्रकांत पाटील (अपक्ष) |
जळगाव शहर | | अभिषेक पाटील (राष्ट्रवादी) | सुरेश भोळे (भाजप) |
जळगाव ग्रामीण | गुलाबराव पाटील (शिवसेना) | पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी) | | गुलाबराव पाटील (शिवसेना) |
अमळनेर | शिरीष चौधरी (भाजप) | अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी) | | अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी) |
जामनेर | | संजय गरुड (राष्ट्रवादी) | गिरीष महाजन (भाजप) |
एरंडोल | | डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी) | चिमणराव पाटील (शिवसेना) |
भुसावळ | संजय सावकारे (भाजप) | जगन सोनवणे (पीआरपी) | संजय सावकारे (भाजप) |
LIVE UPDATES -
- 15.48 PM - चाळीसगाव - भाजपचे मंगेश चव्हाण 5000 मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा केला पराभव
- 15.45 PM - जळगाव शहर - भाजपचे सुरेश भोळे विजयी... आघाडीचे अभिषेक पाटील पराभूत
- 15.10 PM - मुक्ताईनगर - भाजपच्या रोहिणी खडसे पराभूत...तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसेंचा केला 1987 मतांनी पराभव
- 15.09 PM - पाचोरा - भडगाव - शिवसेनेचे किशोर पाटील 2472 मतांनी विजयी... अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंनी दिली जोरदार टक्कर
- 15.00 PM - अमळनेर - राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी... भाजपचे शिरीष चौधरींचा केला पराभव
- 15.00 PM - जामनेर - भाजपचे गिरीश महाजन विजयी...राष्ट्रवादीचे संजय गरूड यांचा केला पराभव
- 14.58 PM - मुक्ताईनगर - 22 व्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 1896 मतांनी पुढे, भाजपच्या रोहिणी खडसे पिछाडीवर
- 14.37 PM - मुक्ताईनगर - 21 व्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे 180 मतांनी मागे
- 14.30 PM - रावेर - काँग्रेसचे शिरीष चौधरीं 15 हजार 609 मतांनी विजयी, भाजपचे आमदार हरिभाऊ जावळेंचा केला पराभव
- 14.02 PM - चोपडा - शिवसेनेच्या लता सोनवणे 20129 मतांनी विजयी
- 13.57 PM - मुक्ताईनगर - १५ व्या फेरीअकेर भाजपच्या रोहिणी खडसे यांना 1881 मतांची आघाडी
- 13.06 PM - भुसावळ - 19 व्या फेरीत भाजपचे संजय सावकारे 40632 मतांनी आघाडीवर
- 13.01 PM - रावेर - सतराव्या फेरीअखेर आघाडीचे शिरीष चौधरी 14287 मतांनी आघाडीवर
- 12.58 PM - मुक्ताईनगर - १५ व्या फेरीअकेर भाजपच्या रोहिणी खडसे यांना 1881 मतांची आघाडी
- 12.52 PM - पाचोरा-भडगाव - 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे किशोर पाटील 3556 मतांनी आघाडीवर
- 12.49 PM - जळगाव ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराव पाटील 42 हजार मतांच्या आघाडीने विजयी
- 12.44 PM - एरंडोल - 17 व्या फेरीअखेर शिवसेनेचे चिमणराव पाटील 16167 मतांनी आघाडीवर
- 12.42 PM - भुसावळ - 17 व्या फेरीअखेर भाजपचे संजय सावकारे 35280 मतांनी आघाडीवर
- 12.39 PM - जळगाव-ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराप पाटील 84527 मतांनी आघाडीवर
- 12.39 PM - पाचोरा-भडगाव - 21 व्या फेरीत शिवसेनेचे किशोर पाटील 3588 मतांनी आघाडीवर
- 12.38 PM - जामनेर - 15 व्या फेरीअखेर भाजपचे गिरीश महाजन 24248 मतांनी आघाडीवर
- 12.37 PM - रावेर - काँग्रेसचे शिरीष चौधरी 14910 मतांनी आघाडीवर
- 12.29 PM - चोपडा - शिवसेनेच्या लता सोनवणे 18445 मतांनी आघाडीवर
- 12.28 PM - पाचोरा-भडगाव - 20 व्या फेरीत शिवसेनेचे किशोर पाटील 4428 मतांनी आघाडीवर
- 12.25 PM - मुक्ताईनगर - 14 व्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे 424 मतांनी पुढे, मताधिक्य घसरले
- 12.18 PM - जळगाव ग्रामीण - 18 व्या फेरीअखेर शिवसेनेचे गुलाबराव पाटील 33598 मतांनी आघाडीवर
- 12.02 PM - भुसावळ - 14 व्या फेरीअखेर भाजपचे संजय सावकारेंना 28448 मतांची आघाडी
- 11.57 AM - चोपडा - शिवसेनेच्या लता सोनवणे 14555 मतांनी आघाडीवर
- 11.54 AM - मुक्ताईनगर - 12 व्या फेरी अखेर भाजपच्या रोहिणी खडसे 1180 मतांनी पुढे
- 11.53 AM - एरंडोल - शिवसेनेचे चिमणराव पाटील 14 व्या फेरीअखेर 13979 मतांनी आघाडीवर
- 11.49 AM - रावेर - बाराव्या फेरीत आघाडीचे शिरीष चौधरी 9041 मतांनी आघाडीवर, त्यांना 42599 तर भाजपचे हरिभाऊ जावळेंना 33558 मते
- 11.37 AM - पाचोरा-भडगाव - नववी फेरी - अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2632 मतांनी आघाडीवर, त्यांना 29331 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 23406 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 13464 मते
- 11.35 AM - मुक्ताईनगर - अकराव्या फेरी अखेर भाजपच्या रोहिणी खडसेंना 1323 चे मताधिक्य
- 11.14 AM - भुसावळ - दहाव्या फेरीत भाजपचे संजय सावकारे 11989 मतांनी आघाडीवर
- 11.12 AM - पाचोरा-भडगाव - आठवी फेरी - अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2783 मतांनी आघाडीवर, त्यांना 26189 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 23406 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 12139 मते
- 11.11 AM - चोपडा - दहावी फेरी अखेर जगदीशचंद्र वळवी आघाडीवर, त्यांना 36435 मते, तर शिवसेनेच्या 38680 मते
- 10.51 AM - रावेर - आठव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी 2513 मतांनी आघाडीवर
- 10.44 AM - पाचोरा-भडगाव - सातव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2205 मतांनी आघाडीवर, त्यांना 23011 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 20806 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 10428 मते
- 10.43 AM - चोपडा - दहावी फेरी अखेर जगदीशचंद्र वळवी आघाडीवर, त्यांना 27925 मते, तर शिवसेनेच्या 31651 मते
- 10.34 AM - मुक्ताईनगर - सातव्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे 2090 मतांनी पुढे
- 10.31 AM - चाळीसगाव - नववी फेरी अखेर मंगेश चव्हाण 4120 मतांनी पुढे
- 10.15 AM - पाचोरा-भडगाव - सहाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2280 मतांनी आघाडीवर, त्यांना 20646 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 18366 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 8716 मते
- 10.15 AM - पाचोरा - पाचोरा-भडगाव - पाचव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 2317 मतांनी आघाडीवर, त्यांना 17900 मते तर शिवसेनेचे किशोर पाटील यांना 15583 मते, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना 7294 मते
- 10.06 AM - चाळीसगाव - सातव्या फेरीअखेर मंगेश चव्हाण 2503 मतांनी आघाडीवर, मंगेश चव्हाण यांना 31136, आघाडीचे राजीव देशमुख यांना 28633 मते
- 9.59 AM - भुसावळ - पाचव्या फेरीत भाजपचे संजय सावकारे 11472 मतांनी आघाडीवर
- 9.57 AM - जळगाव ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराव पाटील 14475 मतांनी आघाडीवर
- 9.55 AM - मुक्ताईनगर - पाचव्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे 2451 मतांनी आघाडीवर
- 9.40 AM - मुक्ताईनगर - चौथ्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 929 मतांनी पुढे
- 9.35 AM - भुसावळ - भाजपचे संजय सावकारे यांना 9023 मतांची आघाडी
- 9.35 AM - चोपडा - आघाडी उमेदवार जगदीश वळवी आघाडीवर, त्यांना 4511 मते, तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत बारेला यांना 4173, शिवसेना उमेदवार लता सोनावणेंना 3834 मते
- 9.33 AM - चाळीसगाव - आघाडीचे राजीव देशमुख 599 मतांनी आघाडीवर
- 9.31 AM - जळगाव ग्रामीण - सहाव्या फेरीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील आघाडीवर, त्यांना 13393 मते
- 9.29. AM - जळगाव ग्रामीण - शिवसेनचे गुलाबराव पाटील 10170 मतांनी आघाडीवर
- 9.15AM - मुक्ताईनगर - तिसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील 344 मतांनी आघाडीवर
- 9.01AM - रावेर - दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे शिरीष चौधरी 1316 मतांनी आघाडीवर, शिरीष चौधरी यांना 3533, तर भाजपचे हरिभाऊ जावळेंना 2206 मते
- 9.01AM - मुक्ताईनगर - दुसऱ्या फेरीत भाजपच्या रोहिणी खडसे फक्त 132 मतांनी आघाडीवर, रोहिणी खडसे 7438 तर अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 7306 मते
- 9.00AM - जळगाव ग्रामीण - शिवसेनेचे गुलाबराव पाटील 4446 मतांनी आघाडीवर
- 8.57AM - पाचोरा-भडगाव - अपक्ष उमेदवार अमोल शिंदे 1200 मतांनी आघाडीवर
- 8.49 AM - रावेर मतदारसंघ - पहिल्या फेरीत आघाडीचे शिरीष चौधरी आघाडीवर, शिरीष चौधरी - 3913, हरिभाऊ जावळे - 2156 तर अनिल चौधरी यांना 1621 मते
- 8.45 AM - चाळीसगाव मतदारसंघातून पोस्टल मतदानात राष्ट्रवादीचे राजीव देशमुख 96 मतांनी पुढे
- 8.42 AM - एरंडोल मतदारसंघातून मतदार संघातून पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील 2500 मतांनी आघाडीवर
- 8.41 AM - भुसावळ मतदारसंघातून पहिल्या फेरीत भाजप उमेदवार संजय सावकारे 3959 मतांनी आघाडीवर
- 8.30 AM - जळगावात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात...
- 8.00 AM - पोस्टल मतमोजणीस सुरूवात
- 7.30 AM - कर्मचारी, अधिकारी मतमोजणी केंद्रावर दाखल
- 7. 00 AM - विधानसभा मतमोजणीची तयारी पूर्ण