ETV Bharat / state

अननस नव्हे तर मेटल ट्रॅप वापरुन होते शिकार, महाराष्ट्रातही केरळसारख्या घटना, 'कटनी', 'बहेनिया' टोळ्या सक्रीय - कटनी, बहेनिया टोळ्यांकडून जळगावात शिकार

केरळ राज्यात अज्ञात लोकांनी एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये फटाके भरुन खायला देत तिची हत्या केली. या घटनेमुळे उद्विग्न झालेल्या वन्यजीव प्रेमींनी सोशल मीडियाद्वारे आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली. याच घटनेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मुद्दा जळगावातील वन्यप्रेमींच्या वर्तुळात चर्चेत आला आहे.

Jalgaon
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 5, 2020, 6:29 AM IST

Updated : Jun 5, 2020, 11:30 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील यावल, रावेर आणि चोपडा तालुक्यातील बहुतांश भाग सातपुडा पर्वतरांगांनी व्यापला आहे. या वनक्षेत्रात असंख्य वन्यप्राणी आहेत. शिवाय वनसंपदा देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे वन्यप्राण्यांची शिकार, वनसंपदेची लूट तसेच वनजमिनींचे अतिक्रमण यासारखे प्रकार सातत्याने घडत असतात. महाराष्ट्रातील मेळघाटातील आदिवासी जमातीसह मध्यप्रदेशातील 'कटनी' आणि 'बहेनिया' या दोन प्रमुख टोळ्यांकडून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. सातपुड्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना सातत्याने घडतात. वनविभागात मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे वन्यप्रेमींचे निरीक्षण आहे.

धक्कादायक; मध्यप्रदेशातील 'कटनी', 'बहेनिया' टोळ्यांकडून होते सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार

सातपुडा पर्वतरांगांमध्ये आतील बाजूस घनदाट जंगल आहे. याठिकाणी वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, ससे, नीलगाय, घोरपड तसेच रानडुक्कर असे असंख्य वन्यप्राणी आहेत. दरवर्षी शेकडो वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना समोर येत असतात. सर्वाधिक शिकार ही हरीण, नीलगाय आणि रानडुक्कर यांची होते. मुखत्वेकरून मांस आणि अवयव यासाठी वन्यप्राण्यांची शिकार होते. वन्यप्राण्यांचे मांस आणि अवयव विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील विविध आदिवासी जमाती पारंपरिक व्यवसाय म्हणून आजही वन्यप्राण्यांची शिकार करतात. लोखंडी तसेच स्टीलचे ट्रॅप लावून, चिमटे लावून वन्यप्राण्यांची शिकार होते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये काही आदिवासी जमाती पारंपरिक गोफणच्या साहाय्याने वन्यप्राण्याच्या डोक्यावर दगडाचा प्रहार करूनही शिकार करण्यात पारंगत आहेत. अशी शिकार ही पाणवठ्याजवळ वन्यप्राणी पाणी पीत असताना केली जाते. सुती जाळे (स्थानिक आदिवासी बोलीभाषेत 'वाघरं') लावूनही वन्यप्राण्यांची शिकार होते.

शेतकऱ्यांकडून होते नीलगाय आणि रानडुक्कराची हत्या

सातपुडा पर्वतरांगांच्या खाली असलेल्या बाजूस म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर आणि चोपडा तालुक्यात मोडणाऱ्या शेतीक्षेत्रात नीलगायी तसेच रानडुक्करांमुळे शेतीपिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होते. शेतीपिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारचे सापळे लावून, पिठाचे गोळे किंवा अन्नधान्यात विषप्रयोग करून नीलगायी आणि रानडुक्करांची हत्या करतात. दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात पिके बहरलेली असताना हे प्रकार घडतात. शेतीपिकांचे नुकसान म्हणून शेतकरी हे कृत्य करत असले तरी वनविभागाकडून अनेकांवर गुन्हे दाखल केले जातात.

'कटनी' आणि 'बहेनिया' प्रमुख शिकारी टोळ्या

सातपुडा पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीमागे 'कटनी' आणि 'बहेनिया' प्रमुख शिकारी टोळ्यांचा हात असतो. या दोन्ही टोळ्या मध्यप्रदेशातील आहेत. मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यात बहेनिया पारधी ही जमात आहे. शिकार हा या जमातीतील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. कटनी जिल्ह्यात ही जमात आढळत असल्याने जिल्ह्याच्या नावावरूनच या शिकारी टोळीला 'कटनी' असे नाव पडले आहे. राजस्थानातील सरिस्का, मध्यप्रदेशातील बांधवगड असो वा मेळघाट या अभयारण्यातील वाघांच्या शिकारीमागे वेळोवेळी 'कटनी' टोळीचा सहभाग आढळून आला आहे. याशिवाय बहेनिया पारधी जमातीमुळे शिकाऱ्यांच्या टोळीला 'बहेनिया' टोळी म्हणूनही ओळखले जाते. कटनी टोळी ही आजची नाही. ही टोळी अनेक वर्षांपासून शिकारीसाठी सक्रिय आहे. वाघांच्या शिकारीवर या टोळीचा भर असतो. मेळघाट किंवा मध्यप्रदेशातील वनक्षेत्रात या टोळीकडून अनेकवेळा वाघांची शिकार झाली आहे. स्टील ट्रॅपद्वारे हे तस्कर वाघाला पकडतात व नंतर वाघाची हत्या करून, त्याच्या कातडीची तस्करी केली जाते.

वाघ, अस्वलाच्या शिकारीवर असतो भर

आतापर्यंत मेळघाट व मध्यप्रदेशात सक्रिय असलेल्या कटनी टोळीचा सहभाग आता सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्येही दिसून येत आहे. कारण येथील स्थानिक आदिवासी हे वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करतात. शिकारीसाठी ते जात नाहीत. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या ज्या काही घटना अलीकडे घडल्या आहेत, त्यात कटनी आणि बहेनिया टोळीतील लोकांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. कटनी टोळीच्या सदस्यांकडे शिकारीसाठी नेहमी बंदुका असतात. जंगलामध्ये स्टील ट्रॅप लावून ते वाघ व अस्वलाची शिकार करतात. स्टील ट्रॅपमध्ये वाघ किंवा अस्वल अडकल्यानंतर बंदुकीद्वारे त्याची हत्या केली जाते. कटनी टोळी ही वाघांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाघांची शिकार करून वाघांची कातडी, नखे तसेच इतर अवयव विकले जातात. हाँगकाँग, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये वाघाची कातडी पाठविली जात असल्याची माहितीही यावेळी वन्यप्रेमींनी दिली.

Last Updated : Jun 5, 2020, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.