ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात चाऱ्याअभावी पशुधन संकटात; चारा छावण्या सुरू करण्याची मागणी - Government

दुष्काळामुळे मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांचीदेखील ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरड्या चाऱ्याच्या 100 पेंढ्यांसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता पैसे देऊनही चारा मिळत नाही.

जळगाव जिल्ह्यात चाऱ्याअभावी पशुधन संकटात
author img

By

Published : Jun 7, 2019, 10:56 AM IST

जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱयांसमोर जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. पाऊस लांबल्यामुळे शासनाने निदान चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरड्या चाऱ्याच्या 100 पेंढ्यांसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता पैसे देऊनही चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत जनावरे सांभाळणे कठीण झाले असून इच्छा नसताना शेतकऱयांना जनावरे विकावी लागत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चाऱ्याअभावी पशुधन संकटात

एवढी बिकट परिस्थिती असतानादेखील सरकारकडून जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होत नाही. एखाद्या संस्थेने चारा छावण्यांची जबाबदारी घेऊन अर्ज करावा, असे सरकार म्हणते. मात्र ग्रामीण भागातून एकही संस्था पुढे येत नसल्याने चारा छावणी सुरू होत नाहीत.

त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेने चाऱ्याची समस्या सोडवली पाहिजे, अशी शेतकऱयांची अपेक्षा आहे. दुष्काळामुळे मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांचीदेखील ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.

Intro:जळगाव
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. पैसे देऊनही चारा मिळत नसल्याने पशुधन सांभाळायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा-पाण्याअभावी पशुधन सांभाळता येत नाही; दुसरीकडे ते विक्रीला काढले तर कुणी घेतही नाही. अशा परिस्थितीत काय करावे, या विवंचनेत पशुपालक आहेत.

Body:जळगाव जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरड्या चाऱ्याच्या 100 पेंढ्यांसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता पैसे देऊनही चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. चाऱ्याच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय देखील धोक्यात आला आहे. गेल्या वर्षी ज्वारी तसेच दादर पिकांचे उत्पादन घटल्यामुळे जनावरांना लागणारा चारा कमी प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच चारा टंचाई जाणवत होती. त्यावेळी पशुपालकांनी आजूबाजूच्या जिल्ह्यातून महागडा चारा आणून वेळ मारून नेली. मात्र, आता कुठेही चारा मिळत नसल्याने पशुधन संकटात सापडले आहे. पाऊस लांबल्यामुळे शासनाने निदान चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दुधाळ जनावरांना अधिक प्रमाणात चारा लागतो. ज्वारी आणि दादरचा चारा पैसे देऊन देखील मिळत नाही. सुग्रास कांडी, सरकी ढेप हे पशुखाद्य महाग असल्यामुळे जनावरांना खाऊ घालता येत नाही. पाण्याची टंचाई असल्याने टँकरचे पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे. आता पाण्याला पैसे द्यावे की महागडे पशुखाद्य आणावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना देखील सरकारकडून जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होत नाही. सरकार म्हणते एखाद्या संस्थेने चारा छावण्यांची जबाबदारी घेऊन अर्ज करावा. पण ग्रामीण भागातून एकही संस्था पुढे येत नसल्याने चारा छावणी सुरू होऊ शकत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेवर चारा छावण्यांची जबाबदारी देऊन चाऱ्याची समस्या सोडवली पाहिजे, अशी पशुपालकांची अपेक्षा आहे.

Conclusion:कोरडा चारा मिळत नसल्याने इच्छा नसताना देखील ग्रामीण भागातील पशुपालकांना जनावरे विकावी लागत आहेत. शेत शिवारातील उसाचे कुजलेले पाचट, गवत आणून दुधाळ जनावरे वाचवण्याची काही पशुपालकांची केविलवाणी धडपड सुरू आहे. काहींनी तर पशुधन वाचावे म्हणून ते आपल्या नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे. एकंदरीतच, भीषण दुष्काळामुळे मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांची देखील ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.