ETV Bharat / state

जळगाव जिल्हा रुग्णालयात उभारणार लिक्विड ऑक्सिजन प्लांट; औरंगाबादच्या कंपनीची निविदा मंजूर

कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात म्हणजेच कोविड रुग्णालयात 21 किलोलीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीवर होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. विशेष म्हणजे, ऑक्सिजनच्या गरजेबाबत रुग्णालय स्वयंपूर्ण होईल.

ऑक्सिजन सिलिंडर
ऑक्सिजन सिलिंडर
author img

By

Published : Oct 4, 2020, 8:34 PM IST

Updated : Oct 4, 2020, 9:00 PM IST

जळगाव - कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात म्हणजेच कोविड रुग्णालयात 21 किलोलीटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. प्लांट उभारणीच्या कामासाठी औरंगाबाद येथील एका कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच संबंधित कंपनीला कार्यादेश देण्यात येणार आहेत. धुळे आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असून, या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर वाहतुकीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

माहिती देताना अधिष्ठाता

डॉ. रामानंद म्हणाले की, कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी कोविड रुग्णालयात एका दिवसाला अवघ्या 150 ते 200 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, आता हे रुग्णालय फक्त कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव झाले असून, या रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल करण्यात येतात. रुग्णालयातील सुमारे साडेचारशे खाटा या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे आहेत. मध्यंतरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानकपणे वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला होता. त्यामुळे कोविड रुग्णालयात एका दिवसाला प्रत्येकी 7 हजार क्षमतेचे 1200 ते 1400 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. त्यामुळे एका पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नव्हता. म्हणून दुसर्‍या पुरवठादाराची मदत घेण्यात आली. सिलिंडरची मागणी व पुरवठा यात अटीतटीची स्थिती निर्माण होत असल्याने त्यावर सातत्याने उपाययोजना कराव्या लागत होत्या. ऑक्सिजन अभावी दुर्घटना घडू नये, म्हणून कोविड रुग्णालयात 'ऑक्सिजन कमिटी' स्थापन करण्यात आली आहे. अनेस्थेशिया विभागप्रमुख डॉ. संदीप पटेल आणि भांडारपाल संजय चौधरी हे कमिटीचे काम पाहत आहेत. रुग्णालयातील 6 ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडर्सची कमतरता भासू नये म्हणून ते परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेऊन असतात. सहाही प्लांटमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक सिलिंडर्स कार्यान्वित असतात. त्यामुळे 24 तासात 1 हजार ते 1200 सिलिंडर्स रिकामे होतात. ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून उत्पादकांच्या संपर्कात रहावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त कामाचा ताण असतो. याशिवाय ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. यावर उपाय म्हणून रुग्णालयातच लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने 100 किंवा त्यापेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयात स्वतःचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट असणे बंधनकारक केले आहे. याच अनुषंगाने, धुळे आणि कोल्हापूर याठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या धर्तीवर जळगावात देखील लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. कोविड रुग्णालयात तीन ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली असून, प्लांट उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीच्या सहमतीने सोयीच्या जागेची निश्चिती होणार आहे. औरंगाबाद येथील कंपनीची निविदा मंजूर झाली असून, लवकरच कार्यादेश देऊन काम सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात प्लांट कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असेही डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.

21 किलोलीटर क्षमतेचा असेल प्लांट

कोविड रुग्णालयात उभारण्यात येणारा लिक्विड ऑक्सिजन प्लांट हा 21 किलोलीटर क्षमतेचा असणार आहे. त्यात एकाच वेळी सुमारे अडीच हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. एका जम्बो सिलिंडरमध्ये सुमारे 7 हजार लीटर ऑक्सिजन असतो. म्हणजेच, एकदा अडीच हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मित झाल्यानंतर, कोविड रुग्णालयाची आजची गरज लक्षात घेता किमान 5 ते 6 दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल. या माध्यमातून ऑक्सिजनची गरज तर पूर्ण होईलच, शिवाय ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीवर होणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे परिश्रम वाचणार आहेत. विशेष म्हणजे, ऑक्सिजनच्या गरजेबाबत रुग्णालय स्वयंपूर्ण होईल, असा दावाही डॉ. रामानंद यांनी केला.

हेही वाचा - जळगावात परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; मक्याला फुटले कोंब

Last Updated : Oct 4, 2020, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.