जळगाव - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या आवाहनाला जळगावकर नागरिकांनी सकाळी उत्तम प्रतिसाद देत घराबाहेर पडणे टाळले. परंतु, सायंकाळी 7 वाजेनंतर जळगावकरांची बेफिकिरी उघड झाली. अनेक जण बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडल्याने जनता कर्फ्यूचे महत्त्व ओसरले.
हेही वाचा - 'तुमचे आभार... मात्र 'अशा' लोकांना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देऊ नका'
जळगावात सकाळपासून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी उशिरापर्यंत नागरिकांचा प्रतिसाद कायम होता. परंतु, सायंकाळी वाजेनंतर चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक जण पायी फिरताना तसेच वाहनांवरून फिरताना दिसून आले. शहरातील गणेश कॉलनी, कोर्ट चौक, स्टेडियम परिसर, महापालिका परिसर, टॉवर चौकात ठिकठिकाणी नागरिकांचे टोळके नजरेस पडले. काही ठिकाणी तर सलूनची दुकाने, मेडिकल देखील सुरू झाले होते.Conclusion:अनेक ठिकाणी पोलिसांनी दुकाने उघडणाऱ्यांना तंबी देऊन दुकाने बंद करण्यास भाग पाडले. तर बाहेर फिरणाऱ्यांना देखील घरी परत जाण्याचे आवाहन केले. पोलिसांनी काही टवाळखोरांना लाठ्यांचा प्रसादही दिल्याचे पाहायला मिळाले.