ETV Bharat / state

भूत असल्याचा बनावट व्हिडीओ बनवून केला व्हायरल, तिघांना जामनेर पोलिसांनी केली अटक - fake videos of ghosts

जामनेर तालुक्यातील तीन तरुणांनी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर एका कारमध्ये बसून भुताचा बनावट व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत त्यांनी शीर नसलेला एक मुलगा आणि एक महिला रस्त्यावरून उलट्या पावलांनी चालत असल्याचे दृश्य तयार केले होते. त्यांनी एका कारमध्ये बसून हा प्रकार शूट केला होता. या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

भूत असल्याचा बनावट व्हिडीओ बनवून केला व्हायरल, तीघांना जामनेर पोलिसांनी केली अटक

author img

By

Published : Sep 27, 2021, 7:20 AM IST

Updated : Sep 27, 2021, 7:28 AM IST

जळगाव - भुताचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून, जनतेत भीती निर्माण करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडला आहे. रात्रीच्या अंधारात शीर नसलेले मुलाचे धड आणि एक महिला उलट्या पावलांनी चालत असल्याचा कथित व्हिडिओ टारगट तरुणांनी तयार केला होता. हे टारगट एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत, आपण हे भूत पाहिल्याचा दावाही केला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी कथित व्हिडिओची सत्यता पडताळून त्याचा भांडाफोड केला.

माहिती देताना पोलीस

काय आहे नेमका प्रकार?

जामनेर तालुक्यातील तीन तरुणांनी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर एका कारमध्ये बसून भुताचा खोटा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत त्यांनी शीर नसलेला एक मुलगा आणि एक महिला रस्त्यावरून उलट्या पावलांनी चालत असल्याचे दृश्य तयार केले होते. त्यांनी एका कारमध्ये बसून हा प्रकार शूट केला होता. शूटिंग करताना त्यांनी कारचे हेडलाईट डिप्पर मोडमध्ये ठेवले होते. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून, जामनेर तालुक्यात रस्त्यावर भूत फिरत असल्याची अफवा पसरवली होती.

जामनेर तालुक्यात पसरली होती भीती-

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे फत्तेपूर, तोरणाळा, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण जामनेर तालुक्यात व्हिडिओची चर्चा पसरली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. तेव्हा फत्तेपूर औट पोस्टच्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. नंतर तो व्हिडिओ हा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. जनतेत भीती पसरवल्याने पोलिसांनी तिघांवर कारवाई केली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी जनतेला अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला भुताचा व्हिडीओ बनावट असून, तो व्हायरल करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे. असा काहीही प्रकार प्रत्यक्षात घडलेला नाही, असेही बनसोड म्हणाले.

Last Updated : Sep 27, 2021, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.