ETV Bharat / state

जळगाव: दुचाकी चोराला अटक, एक दुचाकी जप्त - Jalgaon District Latest News

धुळे तालुक्यातून दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातून अटक केली आहे. शशिकांत ताराचंद बाविस्कर (वय २१, रा. चौगाव, ता. चोपडा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

दुचाकी चोराला अटक
दुचाकी चोराला अटक
author img

By

Published : Mar 3, 2021, 3:28 AM IST

जळगाव - धुळे तालुक्यातून दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातून अटक केली आहे. शशिकांत ताराचंद बाविस्कर (वय २१, रा. चौगाव, ता. चोपडा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

चोरीची दुचाकी हस्तगत

बाविस्कर याने गेल्या वर्षी धुळे तालुक्यातून एक दुचाकी चोरली होती. यानंतर तो मुळगावी म्हणजेच चौगाव येथे येऊन राहत होता. दरम्यान, चोपडा तालुक्यात बाविस्कर हा संशयितपणे दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार रवींद्र गायकवाड, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, प्रदीप पाटील, भरत पाटील, परेश महाजन यांच्या पथकाने बाविस्कर याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला धुळे तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.