जळगाव - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण फासत संताप व्यक्त केला.
जळगावातील महापालिका इमारतीसमोर शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला कार्यकर्त्या शोभा चौधरी, सरिता माळी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीचाही नोंदवला निषेध
या आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू; सरपंचासाठी आरक्षण सोडत
हेही वाचा - जळगावात तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक