ETV Bharat / state

जळगावातील रथोत्सवात घडले संस्कृतीचे दर्शन; कोरोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा

author img

By

Published : Nov 26, 2020, 5:08 PM IST

दरवर्षी कार्तिक प्रबोधिनी एकादशीला जळगावात रथोत्सव साजरा केला जातो. जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट होते.

Jalgaon Rathotsav
जळगाव रथोत्सव

जळगाव - 'दाही सरता वहन आली एकादशी मोठी, मंग सावरला रथ, झाली गावामंधी दाटी' खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या कवितेच्या ओळी ऐकल्या की सुवर्णनगरी जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची आठवण येते. गुरुवारी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर सुवर्णनगरीत श्रीराम रथोत्सव साजरा झाला. यावर्षी कोरोनामुळे रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. परंपरा खंडित होऊ नये म्हणून रथाचे जागेवरच विधिवत पूजनकरून १० पाऊले रथ ओढण्यात आला. यावर्षी रथोत्सवाचे स्वरूप छोटेखानी असले तरी भाविकांचा उत्साह मात्र पूर्वीप्रमाणेच होता.

जळगावातील रथोत्सवाचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

गुरुवारी पहाटे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सवमूर्तीला महाअभिषेक घालून काकडा आरती पार पडली. त्यानंतर सकाळी १० वाजेपासून झेंडूच्या फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या रथाला रथघरातून बाहेर काढण्यात आले. मग त्यानंतर सर्व ब्राम्हणवृदांच्या पवित्र व मंगलमय मंत्रोच्चारात रथाची महापूजा करण्यात आली. यावर्षी रथाची महापूजा श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख गादिपती मंगेश महाराज जोशी यांचे चिरंजीव श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. रथाच्या महापूजेनंतर श्रीराम मंदिरात पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या उत्सवमूर्तीची महाआरती झाली. महाआरतीनंतर रामचंद्रांची उत्सवमूर्ती सनईचा मंजुळ सूर, चौघडे व तुतारींचा निनाद तसेच 'जय श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्र की जय' अशा जयघोषात फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान झाली. सेवेकऱ्यांनी रथ जागेवरून १० पाऊले ओढला. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

उत्सवाचा शाही थाट -

श्रीराम रथावर प्रभू रामचंद्रांची उत्सव मूर्ती विराजमान झाली. त्यानंतर रथावर गरुड, मारुती, अर्जुन व दोन लाकडी घोड्यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. तर रथाच्या अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी तसेच पालखीत श्रीसंत मुक्ताईंच्या पादुका होत्या. रथ जागेवरून अवघे १० पाऊले ओढण्यात आला. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मास्क परिधान करून येत होते. रथाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसाद अर्पण केला जात होता.

रथोत्सवाचे यंदाचे १४८वे वर्ष -

शहरातील जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर म्हणजे समस्त जळगावकरांचे ग्रामदैवत आहे. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. या धार्मिक उत्सवांतील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे रथोत्सव होय. दरवर्षी कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघणाऱ्या श्रीराम रथोत्सवाचे यंदाचे १४८वे वर्ष होते. कोरोनामुळे रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे रथोत्सव जागेवरच साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे श्रीराम मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीने सामाजिक भान जपत साध्या पद्धतीने रथोत्सव साजरा केला. रथाच्या महापूजेवेळी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह रथोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

१८७२पासून सुरू झाली परंपरा -

श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादिपती मूळ सत्पुरुष श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत साक्षात मुक्ताबाईंचा (संत शिरोमणी) साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टान्त देऊन वहन व रथोत्सवाची प्रेरणा आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे इसवी सन १८७२पासून आजतागायत १४८ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. समाजातील १८ पगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आप्पा महाराज यांनी रथोत्सव सुरू केला होता.

हेही वाचा - अखेर जमलं 'बाबा'! हत्तीवर बसून रामदेव बाबांचा 'योग'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.