ETV Bharat / state

हाथरस प्रकरण: राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून अमित शाह यांना मीराबाईंची दोरखंडाने जखडलेली मूर्ती भेट

author img

By

Published : Oct 5, 2020, 5:35 PM IST

उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगावात राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

Agitation
आंदोलन

जळगाव - राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोरखंडात जखडलेली संत मीराबाई यांची मूर्ती स्पीड पोस्टाद्वारे पाठवण्यात आली. सध्या देशातील महिलांची अवस्था अशीच झाली आहे. त्यांचे दोरखंड सोडवण्यासाठी गृहमंत्र्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी केली.

अमित शाह यांना मीराबाईंची दोरखंडाने जखडलेली मूर्ती भेट

हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामुहिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला. पोस्ट कार्यालयाच्या बाहेर कल्पिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्या भोसले, मंगला पाटील प्रतिभा शिरसाठ यांनी संत मीराबाई यांची दोरखंडाने जखडलेली मूर्ती आणून अमित शाह यांना पाठवली.

हाथरस घटनेबद्दल कल्पिता पाटील यांनी संताप व्यक्त केला. यातील दोषींना तत्काळ अटक करुन त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा दिल्लीपर्यंत धडक मोर्चा आणण्याचा इशारा देखील पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.