ETV Bharat / state

जिल्हा कारागृहातून पळालेले दोघे सराईत गुन्हेगार जिल्ह्यातच ठाण मांडून? पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह - Prisoners run away

कारागृहातून तीन गुन्हेगार पळून जाण्याच्या घटनेला 25 दिवस उलटले आहेत. त्यानंतर हे गुन्हेगार जिल्ह्यात फिरत असल्याचे निष्पन्न होऊनही पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा कारागृहातून पळालेले दोघे सराईत गुन्हेगार जिल्ह्यातच ठाण मांडून? पोलिसांची पथके हात हलवत

author img

By

Published : Aug 19, 2020, 1:27 PM IST

जळगाव - येथील जिल्हा कारागृहातून सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून पळालेल्या तीन कैद्यांपैकी गौरव विजय पाटील (वय 21, रा. तांबापुरा, अमळनेर) आणि सागर संजय पाटील (वय 22, रा. पैलाड, अमळनेर) हे दोघे सराईत गुन्हेगार जिल्ह्यातच ठाण मांडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. 25 जुलैपासून हे गुन्हेगार कारागृहातून पळाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांची विशेष पथके त्यांच्या मागावर आहेत. पण गुन्हेगार जिल्ह्यात फिरत असूनही ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत.

कारागृहातून तीन गुन्हेगार पळून जाण्याच्या घटनेला 25 दिवस उलटले आहेत. त्यानंतर हे गुन्हेगार जिल्ह्यात फिरत असल्याचे निष्पन्न होऊनही पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी अमळनेर शहरात एक जबरी लुटीची घटना घडली आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील रहिवासी असलेला सनी अनिल कचरे हा तरुण सकाळी त्याच्या भावाच्या मित्राची (एमएच 19 डीएल 8534) क्रमांकाची दुचाकी घेऊन अंबर्षी टेकडी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास मॉर्निंग वॉक आटोपून घराकडे परत निघत असताना दोन तरुणांनी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावली. खिशातून बळजबरीने दुचाकीची चावी काढून घेत दुचाकी घेऊन पळ काढला होता.

ही घटना घडत असताना दोन्ही तरुण एकमेकांशी बोलत असताना त्यांची नावे गौरव पाटील आणि सागर पाटील असल्याचे सनी याला समजले. ही घटना घडल्यानंतर सनी याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून जिल्हा कारागृहातून पळालेले गौरव व सागर पाटील या गुन्हेगारांचा अमळनेरसह जिल्ह्यातच वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही त्यांच्या मागावर असलेली पोलिसांची पथके हात हलवतच फिरत आहेत.

'ते' दोघे कारागृहातून पळालेले गुन्हेगारच, अमळनेर पोलिसांकडून दुजोरा-

अमळनेर येथे घडलेल्या जबरी लुटीच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे 25 जुलै रोजी जिल्हा कारागृहातून पळालेले गौरव व सागर पाटील हेच गुन्हेगार आहेत. जबरी लुटीचा गुन्हा घडल्यानंतर अमळनेर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ते निष्पन्न झाले आहे. अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास मोरे यांनी तसा दुजोरा 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिला. दोघेही अमळनेरात आलेले होते. काही वेळ ते शहरात थांबलेही होते. पण पोलिसांना याची कानोकान खबर नव्हती. चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग आली. दुचाकी चोरल्यानंतर दोघे फरार झाले आहेत. या घटनेनंतर ते अमळनेर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच ते पळून जाण्यात यशस्वी झाले. अमळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सतत गुंगारा देण्यात त्यांना यश येत आहे. दोघांनी एकप्रकारे पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

दोघे सतत अमळनेरच्या संपर्कात-

गौरव व सागर पाटील हे गुन्हेगार कारागृहातून पळून गेल्यानंतर सतत अमळनेरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते अधूनमधून काही वेळ अमळनेर शहरात येतात. दोघे मित्रांना तसेच कुटुंबीयांना भेटत असल्याचेही खुद्द अमळनेर पोलीस मान्य करतात. दोन दिवसांपूर्वी अमळनेरात आलेले असताना मात्र, ते कुटुंबीयांना भेटले नसल्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितले. जर ते अमळनेरच्या संपर्कात असतील तर पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश का येत नाहीये? हे अनुत्तरित आहे. दरम्यान, अमळनेरात जबरी लूट करताना दोन्ही आरोपींनी पुन्हा एकदा पिस्तूल वापरल्याचे समोर आले आहे. कारागृहातून पळून जात असताना वापरलेले ते 'हेच' पिस्तूल असावे, अशी शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही आरोपींना लवकर पकडले नाही तर ते अजून गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याची भीती आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगाव जिल्हा कारागृहातून 25 जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कैदी सुशील मगरे (वय 32, रा. कसबे पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील आणि सागर संजय पाटील हे तिघे पळून गेले होते. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीवर असलेले रक्षक पंडित दामू गुंडाळे यांना मारहाण करत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून तिघा कैद्यांनी फिल्मीस्टाईल पलायन केले होते. हे प्रकरण घडल्यानंतर कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी तातडीने जळगावात येऊन चौकशी केली होती. या प्रकरणानंतर जिल्हा कारागृह आणि पोलीस प्रशासनाची राज्यभर नाचक्की झाली आहे. फरार असलेल्या तीनही गुन्हेगारांपैकी गौरव व सागर हे जिल्ह्यातच फिरत असल्याचे समोर आले आहे. परंतु, बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेला सुशील मगरे याच्याबाबतीत कोणतीही माहिती नाहीये. तीनही गुन्हेगारांपैकी गौरव व सागर हे कमी वयाचे आहेत. मात्र, तरीही ते पोलिसांना चांगलेच जेरीस आणत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.