ETV Bharat / state

टवाळखोरांना पोलिसांचा दणका, लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या 35 जणांना पकडले

author img

By

Published : Apr 5, 2020, 8:24 PM IST

आज (रविवार) शहरातील आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुलीसह इतर ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी टवाळखोरांना चांगलाच चोप दिला. त्यांच्या दुचाकीदेखील जप्त केल्या.

jalgaon police take acation on 35 people for rider without cause
टवाळखोरांना पोलिसांचा दणका : लॉकडाऊनच्या काळात फिरणाऱ्या 35 जणांना पकडले

जळगाव - कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु, तरीही काही नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात आज दिवसभरात पोलिसांनी ठिकठिकाणी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना सुमारे 35 टवाळखोरांवर कारवाई केली. या कारवाईत काहींच्या दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

जळगाव शहरात आतापर्यंत कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, त्यातील एका 63 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलीस आता लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस...

आज (रविवार) शहरातील आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफुलीसह इतर ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी टवाळखोरांना चांगलाच चोप दिला. त्यांच्या दुचाकीदेखील जप्त केल्या.

कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये, म्हणून नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, विनाकारण बाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे.

हेही वाचा - CORONA : जळगावात दोन कोरोना संभाव्य रुग्णांचा मृत्यू, चाचणी अहवाल येणे बाकी

हेही वाचा - #Covid19: जळगाव शासकीय रुग्णालयातील ‘पीपीई’ किट संपले; वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी धास्तावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.