जळगाव: रावेर शहरातून एका टॅक्सीत जाणार्या एक महिलेकडे ब्राऊनशुगर असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (४५) रा. मोमीनपुरा वडा कमेलापास जि. बर्हाणपुर या महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेस ताब्यात घेतल्यानतंर रावेर तालुक्याच्या तहसिलदार उषाराणी देवगुने यांच्या समोर महिल पोलिस अधिकार्यांनी तीची झडती घेतली. तीच्या जवळ ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर सापडली.त्याली किंमत १ कोटी ८ हजार रुपये आहे. तीने ही ब्राऊन शुगर मध्यप्रदेशातील मन्दसौर येथिल सलीम खान शेर बहादुर खान (रा. किटीयानी कॉलनी मनसौर) याचे कडुन घेतल्याची माहीती दिली आहे.
पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना
जळगाव पोलिसांचे एक पथक मन्दसौर येथिल सलीम खान शेर बहादुर खान यांच्या शोधार्थ मध्यप्रदेशात रवाना झाल्याची माहीती पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. मध्यप्रदेशातून येणारा हा अंमली पदार्थाचा साठा जळगाव जिल्ह्यात की, महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी जात होता ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
अंमली पदार्थ अन् जिल्हा पुन्हा चर्चेत
काही दिवसांपूर्वी एनसीपीने नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी एरंडोल येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. आता रावेरमधे ब्राऊनशुगरचा साठा जप्त करण्यात आल्याने जळगाव पुन्हा चर्चेत आले आहे.