ETV Bharat / state

गुटखा जप्ती प्रकरणी पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी - जळगाव गुन्हे शाखा

चाळीसगाव येथे घडलेल्या गुटखा ट्रक जप्तीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची बदली करण्यात आलीय. यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. गुटखा प्रकरण त्यांना भोवल्याची चर्चा आहे.

पोलीस निरीक्षक बापू रोहोम
पोलीस निरीक्षक बापू रोहोम
author img

By

Published : Oct 31, 2020, 10:49 AM IST

जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू गंगाधर रोहोम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले. चाळीसगाव येथे घडलेल्या गुटखा ट्रक जप्तीच्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर बापू रोहोम यांचीही बदली झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. गुटखा प्रकरण त्यांना भोवल्याची चर्चा आहे.

जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले. यात रोहोम यांचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने ही बदली करण्यात आल्याचे कारण त्यात नमूद करण्यात आले आहे.

गुटखा प्रकरण भोवले...

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील लाखोंच्या गुटखा जप्ती प्रकरणात यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ७ पोलीस कर्मचार्‍यांसह मेहुणबारे येथील सहायक पोलीस निरीक्षक यांना निलंबित केले आहे. याच गुटखा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची ही पोलीस दलातील प्रतिष्ठेची आणि 'क्रीम पोस्टिंग' मानली जाते, त्यामुळे या पदासाठी अनेक अधिकारी नेहमीच इच्छुक असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.