ETV Bharat / state

लोकसभेच्या यशामुळे विधानसभेला गाफिल राहू नका; जळगावात भाजप नेत्यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान - जळगाव भाजप शक्तिकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक

आपल्याला लोकसभेत आभूतपूर्व यश मिळाले पण आगामी निवडणूक राज्याची आहे. तेव्हा लोकसभेच्या यशामुळे येत्या विधानसभेला गाफील राहू नका, अशा शब्दात जळगावमध्ये भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

जळगावात भाजप नेत्यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
author img

By

Published : Aug 16, 2019, 7:54 AM IST

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने बुधवारी मतदारसंघातील शक्तिकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. मात्र, आगामी निवडणुक ही राज्याची आहे. यात केंद्राचे नेतृत्त्व कामी येईल असे नाही, तेव्हा कोणीही गाफील राहू नका, अशा शब्दांत भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.

लोकसभेच्या यशामुळे विधानसभेला गाफिल राहू नका; जळगावात भाजप नेत्यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन मजबुतीसाठी नेत्यांनी यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ व पन्ना प्रमुख तसेच कार्यकर्त्यांचे कान टोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.

शहरातील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री एकनाथ खडसे, संघटनमंत्री विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

माध्यमांना प्रवेश नाकारला

या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. बैठकीच्या सुरुवातीला माध्यम प्रतिनिधींनी छायाचित्रण आणि छायाचित्रे काढल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बंदद्वार चर्चा करण्यात आली. माध्यमांना दिलेल्या अशा वागणुकीमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:जळगाव
लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत ही राज्याची निवडणूक आहे. यात केंद्राचे प्रश्न, केंद्राचे नेतृत्त्व कामी येणार नाही, हे लक्षात घ्या. गाफील राहू नका, अशा शब्दांत भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.Body:आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने बुधवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तिकेंद्र प्रमुखांची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री एकनाथ खडसे, संघटनमंत्री विजय पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन मजबुतीसाठी नेत्यांनी यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ व पन्ना प्रमुख तसेच कार्यकर्त्यांचे कान टोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले.Conclusion:माध्यमांना प्रवेश नाकारला-

दरम्यान, या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला माध्यम प्रतिनिधींनी छायाचित्रण आणि छायाचित्रे काढल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बंदद्वार चर्चा झाली. माध्यमांना दिलेल्या अशा वागणुकीमुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.

बाईट: गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

For All Latest Updates

TAGGED:

jalgaon news
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.