ETV Bharat / state

जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल - हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न जळगाव

जळगावात यापूर्वी एका राजकीय नेत्याचे ज्या पद्धतीने अश्लील फोटो व्हायरल झाले, अगदी त्याच पद्धतीने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आली असून, ही माहिती खुद्द त्याच महिलेने दिल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Oct 20, 2020, 4:44 PM IST

जळगाव - राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्याला वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेच्या माध्यमातून 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून, आपले अश्लील फोटोग्राफ व्हायरल करण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल

जळगावात यापूर्वी एका राजकीय नेत्याचे ज्या पद्धतीने अश्लील फोटो व्हायरल झाले, अगदी त्याच पद्धतीने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आली असून, ही माहिती खुद्द त्याच महिलेने दिल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला. यामागे राजकीय क्षेत्रातील काही दिग्गज लोकांचा हात असल्याचा आरोपही अभिषेक पाटील यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन तिची चौकशी केली. तिने पोलिसांकडे कबुलीही दिली आहे, असा दावा अभिषेक पाटील यांनी केला आहे. अभिषेक पाटील यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना या महिलेचा मोबाईलवर कॉल आला व मला तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले.

हेही वाचा - जळगावातील सुवर्ण बाजाराची घडी पूर्वपदावर; सोने ५१ हजार रुपये प्रतितोळा

त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी पक्षाच्या कार्यालयात बोलावले. परंतु कार्यालय बंद असल्याने ही महिला रिंग रोडवरील कार्यालयात आली. मी शहरात काही राजकीय लोकांना मुली पुरविण्याचे काम करते, माझा तो व्यवसाय आहे. मला तुम्हाला उद्ध्वस्त करायचे नाही. मागील काही महिन्यांपूर्वी एका राजकीय नेत्याचे अश्लील फोटो व्हायरल झाले तसे तुमच्यासोबत मुलीला पाठवून फोटो, व्हिडीओ करुन ते व्हायरल करायचे आहेत, ते शक्य झाले नाही तर बलात्कार किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही मुलीला तयार करायचे. या कामासाठी पाच लाख रुपये मिळणार आहेत, असेही या महिलेने आपणास सांगितल्याचे अभिषेक पाटील यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचा महानगराध्यक्ष या नात्याने आपण मनपा व इतर अनेक गैरकारभार तसेच भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे, त्यामुळे विरोधकांकडून अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. त्याचाच हा असल्याचे अभिषेक पाटील यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. अभिषेक पाटील यांनी देखील याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून, चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.