ETV Bharat / state

जळगावातील 'ते' वादग्रस्त अतिक्रमण भल्या पहाटे काढले; रहदारीला ठरत होते अडथळा - ख्वाजामियाँ दर्ग्याजवळचे अतिक्रमण हटवले

दिवसागणिक वाढणाऱ्या रहदारीला हे अतिक्रमण मोठा अडथळा ठरत होते. प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणामुळे याठिकाणी वाहतूककोंडी होत असे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्याची मागणी होती. परंतु, हे अतिक्रमण काढण्यास एका समुदायाचा विरोध होता.

jalgaon
वादग्रस्त अतिक्रमण भल्या पहाटे काढले
author img

By

Published : Jan 21, 2021, 11:47 AM IST

जळगाव - शहरातील गणेश कॉलनी भागात ख्वाजामियाँ दर्ग्याजवळ असलेले प्रार्थनास्थळाचे एक वादग्रस्त अतिक्रमण महापालिका प्रशासनाने आज (गुरुवारी) पहाटे 5 वाजेच्या सुमारास कारवाई करत काढले. रस्त्यावरील रहदारीला अडथळा ठरत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली जात होती. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. हे अतिक्रमण काढल्याने आता गणेश कॉलनीतील ख्वाजामियाँ चौकातील वाहतूककोंडी दूर होणार आहे.

वादग्रस्त अतिक्रमण भल्या पहाटे काढले
वादग्रस्त अतिक्रमण भल्या पहाटे काढले

शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौक या रस्त्यावर ख्वाजामियाँ चौकात गेल्या काही वर्षांपासून एका प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण होते. दिवसागणिक वाढणाऱ्या रहदारीला हे अतिक्रमण मोठा अडथळा ठरत होते. प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणामुळे याठिकाणी वाहतूककोंडी होत असे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्याची मागणी होती. परंतु, हे अतिक्रमण काढण्यास एका समुदायाचा विरोध होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नव्हती. मात्र, वाहतूककोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन आता हे अतिक्रमण काढण्यात आले.

सर्वांना विश्वासात घेऊन काढले अतिक्रमण-

महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी या अतिक्रमणप्रश्नी सामंजस्याची भूमिका घेऊन सर्वांना विश्वासात घेतले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागत असल्याची बाब पटल्याने हे अतिक्रमण काढण्यास आजवर अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या समुदायाने सहमती दर्शवली. अखेर ते अतिक्रमण हटवण्यात आले.

' वादग्रस्त अतिक्रमण भल्या पहाटे काढले

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पहाटे कारवाई-

प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाच्या वतीने भल्या पहाटे कारवाई करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

चोख पोलीस बंदोबस्त-

कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश कॉलनी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे फौजफाट्यासह घटनास्थळी ठाण मांडून होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.