ETV Bharat / state

एकनाथ खडसेंचे पुस्तक प्रकाशन वादात; सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने 'या' आमदाराकडून कारवाईची मागणी

स्वपक्षावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांना भाजपच्याच आमदाराने अडचणीत आणले आहे. खडसे यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नसल्याने कारवाई करण्याची जळगावच्या आमदारांनी मागणी केली आहे.

एकनाथ खडसेंचे पुस्तक प्रकाशन
एकनाथ खडसेंचे पुस्तक प्रकाशन
author img

By

Published : Sep 11, 2020, 4:26 PM IST

जळगाव - भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे' या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नसल्याचा आरोप मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असतानाही अशा पद्धतीने जाहीरपणे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडाला. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यासह सर्वत्र कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाईची मागणी

भुसावळ येथील भाजपचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर पुस्तक लिहिले आहे. गुरुवारी दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून खडसे समर्थक तसेच भाजपचे कार्यकर्ते आले होते. कार्यक्रमस्थळी गर्दी जमल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. या विषयासंदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासह सर्वत्र कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत चालला आहे. मात्र, तरीही एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेऊन गर्दी जमविली.

पोलिसांनी दखल घेतली नाही-

पुस्तक प्रकाशन करण्यास हरकत नाही. त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम घेणे, गर्दी जमवून 'सोशल डिस्टन्सिंग'चा भंग करणे खडसेंना शोभणारे नाही. एवढे होऊनही स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतलेली नाही. मुक्ताईनगरात आंदोलन केले असता त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. परंतु, खडसेंच्या फार्महाऊसवर झालेल्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'च्या नियमांचे उल्लंघन होऊनही दखल घेण्यात आलेली नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

खडसेंचे दुखते कुठे शेकतात कुठे-

चंद्रकात पाटील पुढे म्हणाले, की एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सामाजिक भान जपायला हवे. भाजपचे ते ज्येष्ठ नेते असताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपली खंत बोलवून दाखवायला हवी होती. त्यासाठी जाहीर व्यासपीठावरून बोलण्याची काय गरज होती. पण खडसेंचे दुखते कुठे आणि ते शेकतात कुठे. त्यांना आता वैफल्य आले आहे. याच वैफल्यातून ते असे प्रकार करत आहेत. अशा प्रकारच्या चुकांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढत आहे. एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून काही उपाययोजना झाल्याचे मला दिसत नाही. कोरोना नियंत्रित करण्यासाठी सर्वांनी समाजभान जपण्याची गरज आहे, असा टोलाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लगावला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील शाब्दिक युद्ध थांबले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शीतयुद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.