ETV Bharat / state

जळगावचे महापौर पद महिला खुल्या गटासाठी राखीव

राज्यातील २७ महानगरपालिका पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव महानगरपालिका खुले (महिला) संवर्गासाठी राखीव असणार आहे.

जळगाव
author img

By

Published : Nov 13, 2019, 11:53 PM IST

जळगाव - महापालिकेच्या पुढील अडीच वर्षासाठीच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी मुंबईला जाहीर झाली. यामध्ये जळगाव महापालिकेचे महापौरपद हे महिला खुल्या गटासाठी राखीव झाल्यामुळे महापालिकेत पुन्हा महिलाराज कायम राहणार आहे. महापालिकेत ७५ नगरसेवकांपैकी एकूण ४२ नगरसेविका असून, यामध्ये ३४ नगरसेविका भाजपच्या आहेत. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षासाठी महापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

जळगावचे महापौर पद महिला खुल्या गटासाठी राखीव

राज्यातील २७ महापालिकेच्या महापौरपदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात जाहीर करण्यात आली. विद्यमान महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपणार आहे. त्यामुळे आता मार्च २०२१ मध्ये महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीला महापौर सीमा भोळे, सभागृह नेते ललित कोल्हे हे उपस्थित होते. सध्या महापालिकेतील महापौरपद ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे २००३ नंतर यंदा देखील महापालिकेत पाचही वर्ष महिलाराज राहणार आहे.

हेही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांवर अद्यापही कारवाई नाही; महापालिका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात
२३ महिला खुल्या प्रवर्गातून विजयी

महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव झाले असली तरी २३ नगरसेविका या अधिकृतरित्या खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. यामध्ये १६ नगरसेविका या भाजपच्या आहेत. ५ नगरसेविका शिवसेनेच्या तर २ नगरसेविका या एमआयएमच्या आहेत. दरम्यान, महापालिकेत भाजपचेच बहुमत असल्याने भाजपचा महापौर होईल यात शंका नाही. मात्र, महापौरपदाची निवड करताना शक्यतो खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्याच नगरसेविकेचा विचार भाजप नेतृत्वाकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - राज्यातील महापौरपदांसाठी आरक्षण सोडत; जळगाव पालिकेबाबत काय होणार?
सरदार पटेल यांचा पुतळा अनावरणानंतर महापौर बदल?

विद्यमान महापौर सीमा भोळे यांना सुरुवातीचे १० महिने संधी दिली जाणार होती. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१९ मध्ये संपला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर सीमा भोळे यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्यात येणार असून, लवकरच या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर महापालिकेत महापौर व उपमहापौर बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - 'जलयुक्त जळगाव' ; सरासरीपेक्षा अधिक पावसाने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा

महापौरपदासाठी आतापासून स्पर्धा

महापालिकेत मार्च २०२१ पासून पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या गटासाठी महापौरपद राखीव असले तरी आतापासूनच महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या ओबीसी महिला राखीव असल्याने भारती सोनवणे व उज्ज्वला बेंडाळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमहापौरपद हे मराठा समाजालाच दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, पुढील अडीच वर्षात मराठा किंवा लेवा समाजाच्या महिलेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. शुचिता हाडा यांना स्थायी समिती सभापती पद दिल्यामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.

Intro:जळगाव
महापालिकेच्या पुढील अडीच वर्षासाठीच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत बुधवारी मुंबईला जाहीर झाली. यामध्ये जळगाव महापालिकेचे महापौरपद हे महिला खुल्या गटासाठी राखीव झाल्यामुळे महापालिकेत पुन्हा महिलाराज कायम राहणार आहे. महापालिकेत ७५ नगरसेवकांपैकी एकूण ४२ नगरसेविका असून, यामध्ये ३४ नगरसेविका भाजपच्या आहेत. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षासाठी महापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.Body:राज्यातील २७ महापालिकेच्या महापौरपदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत बुधवारी मुंबई येथे मंत्रालयात जाहीर करण्यात आली. विद्यमान महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ मार्च २०२१ संपणार आहे. त्यामुळे आता मार्च २०२१ मध्ये महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीला महापौर सीमा भोळे, सभागृह नेते ललित कोल्हे हे उपस्थित होते. सध्या महापालिकेत महापौरपद ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे २००३ नंतर यंदा देखील महापालिकेत पाचही वर्ष महिलाराज राहणार आहे. 

२३ महिला खुल्या प्रवर्गातून विजयी-

महापौरपद महिला खुल्या गटासाठी राखीव झाले असली तरी २३ नगरसेविका या अधिकृतरित्या खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत. यामध्ये १६ नगरसेविका या भाजपच्या आहेत. तर ५ नगरसेविका शिवसेनेच्या तर २ नगरसेविका या एमआयएमच्या आहेत. दरम्यान, महापालिकेत भाजपचेच बहुमत असल्याने भाजपचा महापौर होईल यात शंका नाही. मात्र, महापौरपदाची निवड करताना शक्यतो खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्याच नगरसेविकेचा विचार भाजप नेतृत्वाकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सरदार पटेल यांचा पुतळा अनावरणानंतर महापौर बदल?
 
विद्यमान महापौर सीमा भोळे यांना सुरुवातीचे १० महिने संधी दिली जाणार होती. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१९ मध्ये संपला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर सीमा भोळे यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्यात येणार असून, लवकरच या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर महापालिकेत महापौर व उपमहापौर बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. Conclusion:महापौरपदासाठी आतापासून स्पर्धा-
 
महापालिकेत मार्च २०२१ पासून पुढील अडीच वर्षासाठी खुल्या गटासाठी महापौरपद राखीव असले तरी आतापासून महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. सध्या ओबीसी महिला राखीव असल्याने भारती सोनवणे व उज्ज्वला बेंडाळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमहापौरपद हे मराठा समाजालाच दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, पुढील अडीच वर्षात मराठा किंवा लेवा समाजाच्या महिलेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. शुचिता हाडा यांना स्थायी समिती सभापती पद दिल्यामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.