ETV Bharat / state

सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 51 हजार 500 रुपये प्रतितोळा - जळगाव सोने दरवाढ

लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. आज जळगावात प्रति तोळा(10 ग्रॅम) 51 हजार 500 रुपये इतका दर सोन्याला मिळाला.

Gold
सोने
author img

By

Published : Jul 2, 2020, 5:10 PM IST

Updated : Jul 2, 2020, 5:16 PM IST

जळगाव - सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. आज सकाळी सराफ बाजार सुरू झाला तेव्हा प्रति तोळा(10 ग्रॅम) 51 हजार 500 रुपये इतका दर सोन्याला मिळाला. येत्या आठवडाभरात सोन्याचे 53 हजार रुपये प्रति तोळा असतील, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तवला आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.

सोन्याच्या दरामध्ये येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता

कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरू असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले. आता लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. लग्नसमारंभ देखील काही प्रमाणात सुरू झाल्याने सोने-चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

दरम्यान, सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील सोने खरेदीकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

चांदीचे भावही वाढतेच -

सोन्याचे भाव सतत वाढत असताना दुसरीकडे चांदीचे भाव देखील सातत्याने वाढत आहेत. आज जळगावात चांदीचे भाव प्रतिकिलो 51 हजार 500 रुपये असे होते. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे दर स्थिर असले तरी भारत-चीन, चीन-अमेरिका यांच्यातील तणाव आणि कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या बाबींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत.

सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 51 हजार 500 रुपये प्रतितोळा

Last Updated : Jul 2, 2020, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.