जळगाव Jalgaon Gold News : काही दिवसांपूर्वी 56 हजार रुपये प्रति तोळा (Gold Rate) असलेला सोन्याचा भाव आता पुन्हा वाढू लागलाय. येणाऱ्या काही दिवसात सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या पुढे असेल, असं सराफ व्यावसायिकांचं मत आहे. सोन्याचा भाव अचानक वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.
...तर सोन्याचे भाव 60 हजार रुपयांच्या पुढे : सहा महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव प्रतितोळा 62 हजार रुपयांपर्यंत होता. नंतर हळूहळू तो भाव 58 हजार रुपयांपर्यंत खाली आला. जेव्हा अमेरिकन बँकांनी गुंतवणुकीचे व्याजदर वाढवले तेव्हा सोन्याचा भाव पुन्हा कमी होऊन 56 हजार इतका झाला होता. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोनं सोडून दुसऱ्या फंडमध्ये वळवला होता. आता मात्र, इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Israel and Hamas conflict) सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे फेरबदल झाले आहेत. त्याचाच परिणाम सोन्याच्या भावावर झालाय. सोन्याचा भाव आता वाढू लागला आहेत. सोमवारी सुवर्णनगरी असलेल्या जळगावात सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति तोळा इतका नोंदवला गेला. इस्त्रायल आणि हमासमधली युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे भाव 60 हजार रुपयांच्या पुढे जातील, (Gold Rate May Rise To 60 Soon) असा जाणकारांचा अंदाज आहे.
जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी : आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. सोन्यातली गुंतवणूक ही फायदेशीर मानली जाते. अडचणीच्या काळात लगेच पैसे उपलब्ध होतात, म्हणून अनेक जण सोनं घेऊन ठेवतात. सध्या सोन्याचे भाव वाढत असले तरी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी आहे. मात्र सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी ही दिसून येत आहे.
हेही वाचा -