ETV Bharat / state

जळगाव जिल्हा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यात पावसाची अनियमितता कायम आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 25 ते 28 टक्के इतका पाऊस झाला आहे.

जळगाव जिल्हा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच
author img

By

Published : Jul 27, 2019, 10:53 AM IST

जळगाव - मुंबईसह कोकणात मुसळधार बरसणारा वरुणराजा जळगाव जिल्ह्यावर मात्र रुसला आहे. जुलै महिना संपत आलाय, तरीही जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. येथे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. चांगला पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील निम्मे सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत.

जळगाव जिल्हा अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यात पावसाची अनियमितता कायम आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 25 ते 28 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसात तुरळक पाऊस पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. एरंडोल, चोपडा, यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये मात्र, भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने पिके जळत आहेत. दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम तसेच लघु सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर हतनूर मध्यम प्रकल्पात 23.29 टक्के, वाघूर मध्यम प्रकल्पात 19.44 आणि गिरणा मध्यम प्रकल्पात 7.48 टक्के इतका पाणीसाठा आहे. तीनही मध्यम प्रकल्प मिळून आजमितीस केवळ 11.96 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे अभोरा प्रकल्पात 33.46, सुकी प्रकल्पात 18.54, मोर प्रकल्पात 21.22 आणि तोंडापूर प्रकल्पात 78.11 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुका निहाय पाऊस असा -
जळगाव- 25.3 टक्के
जामनेर- 42.1 टक्के
एरंडोल- 38.3 टक्के
धरणगाव- 28.8 टक्के
भुसावळ- 26.6 टक्के
यावल- 23.4 टक्के
रावेर- 25.9 टक्के
मुक्ताईनगर- 29.5 टक्के
बोदवड- 28.9 टक्के
पाचोरा- 36.7 टक्के
चाळीसगाव- 30.6 टक्के
भडगाव- 26.9 टक्के
अमळनेर- 39.0 टक्के
पारोळा- 32.7 टक्के
चोपडा- 21.6 टक्के

Intro:जळगाव
मुंबईसह कोकणात मुसळधार बरसणारा वरुणराजा जळगाव जिल्ह्यावर मात्र रुसला आहे. जुलै महिना संपायला आला तरीही जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस पडलेला नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे, चांगला पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील निम्मे सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत.Body:पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यात पावसाची अनियमितता कायम आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 25 ते 28 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसात तुरळक पाऊस पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. एरंडोल, चोपडा, यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये मात्र, भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने पिके जळत आहेत. दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील मध्यम तसेच लघु सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर हतनूर मध्यम प्रकल्पात 23.29 टक्के, वाघूर मध्यम प्रकल्पात 19.44 आणि गिरणा मध्यम प्रकल्पात 7.48 टक्के इतका पाणीसाठा आहे. तीनही मध्यम प्रकल्प मिळून आजमितीस केवळ 11.96 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे अभोरा प्रकल्पात 33.46, सुकी प्रकल्पात 18.54, मोर प्रकल्पात 21.22 आणि तोंडापूर प्रकल्पात 78.11 टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.Conclusion:जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय टक्केवारी-

जळगाव- 25.3
जामनेर- 42.1
एरंडोल- 38.3
धरणगाव- 28.8
भुसावळ- 26.6
यावल- 23.4
रावेर- 25.9
मुक्ताईनगर- 29.5
बोदवड- 28.9
पाचोरा- 36.7
चाळीसगाव- 30.6
भडगाव- 26.9
अमळनेर- 39.0
पारोळा- 32.7
चोपडा- 21.6
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.