ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात 'देशव्यापी बंद'ला संमिश्र प्रतिसाद; विविध मोर्चांनी दणाणले कलेक्टोरेट!

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेध म्हणून देशभरातील विविध कामागार संघटनानी आजा (बुधवारी) देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

jalgaon-district-received-a-mixed-response-to-a-india-closed
जळगाव जिल्ह्यात 'देशव्यापी बंद'ला संमिश्र प्रतिसाद
author img

By

Published : Jan 8, 2020, 6:11 PM IST

जळगाव - केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. जळगावात विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चे काढत आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध मोर्चांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच दणाणले होते.

जळगाव जिल्ह्यात 'देशव्यापी बंद'ला संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविणे, सरकारी क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करणे तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटीत, असंघटीत, कंत्राटी तसेच रोजंदारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयू प्रणित जळगाव जिल्हा बांधकाम संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न जळगाव वर्कर्स युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स असोसिएशन, महानगर आशा कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, शेतमजूर संघटना, किसान सभा, रेशन बचाव समिती तसेच महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असोसिएशनने सहभाग नोंदवला. शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांसह बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील या बंदमध्ये सहभागी झाल्या. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आणि महसूल कर्मचारी संघटना देखील बंदमध्ये सहभागी होत्या.

सकाळ सत्रात जिल्हाभरात या बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. मात्र, दुपारी विविध कामगार संघटनांनी एकत्र येत मोर्चे काढत केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांचा निषेध नोंदवला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयू प्रणित जळगाव जिल्हा बांधकाम संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न जळगाव वर्कर्स युनियनने एकत्रितपणे शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र जमून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर प्रत्येक संघटनांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले.

देशव्यापी बंदचा फारसा परिणाम नाहीच -

विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या या देशव्यापी बंदचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही. शाळा, महाविद्यालये तसेच काही बँकांचे कामकाज देखील सुरळीत सुरू होते. जळगाव शहरात कामगार संघटनांनी काढलेल्या मोर्चांमुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर स्वातंत्र्य चौकापासून वाहतूक वळवून ती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूने वळवली होती. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली होती.

Intro:जळगाव
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. जळगावात विविध कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चे काढत आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध मोर्च्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय चांगलेच दणाणले होते.Body:केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविणे, सरकारी क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करणे तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटीत, असंघटीत, कंत्राटी तसेच रोजंदारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयू प्रणित जळगाव जिल्हा बांधकाम संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न जळगाव वर्कर्स युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स असोसिएशन, महानगर आशा कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना, शेतमजूर संघटना, किसान सभा, रेशन बचाव समिती तसेच महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असोसिएशनने सहभाग नोंदवला. शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांसह बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील या बंदमध्ये सहभागी झाल्या. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आणि महसूल कर्मचारी संघटना देखील बंदमध्ये सहभागी होत्या.

सकाळ सत्रात जिल्हाभरात या बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. मात्र, दुपारी विविध कामगार संघटनांनी एकत्र येत मोर्चे काढत केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांचा निषेध नोंदवला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयू प्रणित जळगाव जिल्हा बांधकाम संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न जळगाव वर्कर्स युनियनने एकत्रितपणे शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र जमून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर प्रत्येक संघटनांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले.Conclusion:देशव्यापी बंदचा फारसा परिणाम नाहीच-

विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या या देशव्यापी बंदचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही. शाळा, महाविद्यालये तसेच काही बँकांचे कामकाज देखील सुरळीत सुरू होते. जळगाव शहरात कामगार संघटनांनी काढलेल्या मोर्च्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर स्वातंत्र्य चौकापासून वाहतूक वळवून ती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूने वळवली होती. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.