ETV Bharat / state

जिल्हा न्यायालयाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास सुनावली मरेपर्यंत जन्मठेप - Savlaram Shinde life imprisonment jalgaon

चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय २७ रा. पाचोरा) यास जळगाव जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि २ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायालयाचे न्या. एस.एन. माने-गाडेकर यांनी बुधवार १५ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला.

Savlaram Shinde life imprisonment
सावळाराम शिंदे जन्मठेप जळगाव
author img

By

Published : Feb 16, 2022, 9:52 PM IST

जळगाव - चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय २७ रा. पाचोरा) यास जळगाव जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि २ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायालयाचे न्या. एस.एन. माने-गाडेकर यांनी बुधवार १५ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला. १७ दिवसांत तपास पूर्ण आणि साठ दिवसांत शिक्षा अशा पद्धतीने चाललेला हा जळगाव जिल्ह्यातला पहिलाच खटला आहे. त्यामुळे, या खटल्यात विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात सत्कारही करण्यात आला.

माहिती देताना वकील आणि पोलीस अधिकारी

हेही वाचा - Eknath Kadse Statement On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार; एकनाथ खडसेंचा खोचक टोला

चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षांच्या चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो, असे सांगून आरोपी सावळाराम भानुदास शिंदे याने तिला चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ नेले. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत सावळाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सावळाराम शिंदे याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर भादवी कलम ३६३, ३६६(अ), ३७६ (एबी) व पॉक्सो कायद्या अंतर्गत कलम ४, ५ (एम), ६, ८,९ व १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्याकडे होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे सोपविला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व पीडित मुलीचे कपडे व अंगावरील नमुने तात्काळ प्रयोगशाळेत पाठवून डीएनए अहवाल प्राप्त करून १७ दिवसांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.

एस.एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करयात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी हा खटला जलदगीतने चालविण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या ६० दिवसांत सुनावणी पूर्ण करून बुधवार १६ फेब्रुवारी रोजी खटल्याचा निकाल दिला आहे.

सावळाराम भानुदास शिंदे (वय २७ रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा) यास विविध कलमान्वये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि दोन लाख ७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, दंडातील पन्नास टक्के रक्कम ही पीडितेला देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. शिवाय मनोधैर्य योजनेतून तीन लाख रुपये आणि शासनाकडून दहा लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या खटल्यात संशयिताला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी यशस्वी कामगिरी करणार्‍या अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक तपासाधिकारी सपोनि विशाल टकले, पो.ना. राकेश पाटील, राहूल सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल विमल सानप, सबा शेख, दिलीप सत्रे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - एका वर्षात दोनशे शेत रस्ते करणार - मंत्री गुलाबराव पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.