ETV Bharat / state

जळगाव: उपमहापौर खडके यांच्याकडून जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी - जळगाव जलशुध्दीकरण केंद्र

उपमहापौर सुनील खडके यांनी आज महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्रातील विविध संयत्रे जुनी झालेली आहेत. त्याच बरोबर १ क्वेरीफायर १५ दिवसांपासुन बंद असल्याचे आढळुन आल्याने उपमहापौर यांनी जाब विचारला.

Deputy Mayor Khadke inspects the water purification center
जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी
author img

By

Published : Dec 23, 2020, 9:16 PM IST

जळगाव - ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी शहरातील प्रभागांचा दौरा केल्या नंतर आज अचानक महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

त्रुटी त्वरीत दुर करण्याचे निर्देश-

उपमहापौर सुनील खडके यांच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या भेटीप्रसंगी पाणी पुरवठा सभापती अमित काळे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, महानगरपालिका सदस्य दिलीप पोकळे इतर नगरसेवक आदी यावेळी त्यांच्यासमवेत होते. या भेटीत किरकोळ स्वरुपाच्या आढळलेल्या त्रुटी त्वरीत दुर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. प्रकल्प कार्यान्वयीत होऊन खुप वर्षे झालेली आहेत. आता अमृत योजनेत सर्वच संयत्रे बदलली जाणार असुन, संगणकीय स्वयंचलित प्रणाली उपयोगात आणली जाणार आहे. यासाठी मे २०२० ही कालमर्यादा ठरली असल्याचे उपमहापौर यांनी पत्रकारांना सांगीतले. प्रकल्पावर उपस्थित अभियंता शामकांत भांडारकर आणि विलास पाटील यांनी यावेळी कामकाज आणि सयंत्रांची माहिती दिली.

क्वेरीफायर १५ दिवसांपासुन बंद-

जलशुध्दीकरण केंद्रातील विविध संयत्रे जुनी झालेली आहेत. त्याच बरोबर १ क्वेरीफायर १५ दिवसांपासुन बंद असल्याचे आढळुन आल्याने उपमहापौर यांनी जाब विचारला. याबाबत आजच एक मेकॅनिक यांनी येथे भेट दिली असुन येत्या १ ते २ दिवसात हे क्वेरीफायर देखील सुरु केले जाईल अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडुन देण्यात आली. उपमहापौरांनी जलउपसा केंद्रातील बुस्टर पंपीग स्टेशनलाही भेट दिली. या ठिकाणी सहापैकी एक युनिट बंद असल्याचे आढळुन आले. हे युनिट त्वरीत सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी या भेटीत दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.