ETV Bharat / state

जळगावकरांना नाही 'हेल्मेट' वापराचे गांभीर्य; शहर वाहतूक शाखेकडून वर्षभरात 1 हजार 242 दुचाकीस्वारांवर कारवाई - जळगाव पोलीस न्यूज

जळगाव शहरात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु, त्यापैकी बोटावर मोजता येतील असे नागरिक स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालवताना हेल्मेट वापरतात. जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो. या महामार्गावर तसेच जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

traffice police
वाहतूक पोलीस
author img

By

Published : Feb 2, 2021, 6:22 PM IST

जळगाव - सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी दुचाकीला अपघात झाला तर हेल्मेटमुळे डोक्याला मार न लागता आपला जीव वाचू शकतो. असे असताना जळगावातील बहुतांश नागरिक मात्र, हेल्मेट वापराविषयी कमालीचे बेफिकीर आहेत. त्यांना हेल्मेट वापरणे गैरसोयीचे वाटते. हेल्मेट वापराचे जळगावकरांना गांभीर्यच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, त्यांना जीवाची पर्वा नसल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, हेल्मेट वापराविषयी वेळोवेळी जनजागृती करूनही हेल्मेट न वापरणाऱ्या महाभागांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात हेल्मेट न वापरणाऱ्या 1 हजार 242 जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

वर्षभरात 1 हजार 242 हेल्मेट न वापरणाऱया दुचाकीस्वारांवर कारवाई

जळगाव शहरात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु, त्यापैकी बोटावर मोजता येतील असे नागरिक स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालवताना हेल्मेट वापरतात. जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो. या महामार्गावर तसेच जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा बळी जाण्याचेही प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन साधारणपणे दोन वर्षांपासून पोलीस प्रशासनाच्या वाहतूक शाखेच्या वतीने महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे. जळगाव शहरात तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शहरात मात्र, हेल्मेटची सक्ती नाही.

जिल्ह्यात वर्षभरात 752 अपघात तर 471 बळी-

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मिळवली असता धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यात गेल्या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 752 अपघात झाले आहेत. त्यात 471 जणांचा मृत्यू झाला. तर 514 जण जखमी होऊन जायबंदी झाले. या 752 अपघातांपैकी सुमारे 70 टक्के अपघात हे दुचाकी चालकांचे झाले आहेत. तसेच या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 471 जणांच्या संख्येपैकी सुमारे 80 टक्के संख्या ही दुचाकी अपघातातील नागरिकांची आहे. यापूर्वी 2019 मध्येही जळगाव जिल्ह्यात 835 अपघात झाले होते. त्यात 454 जणांचे बळी गेले होते. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये झालेल्या अपघातांच्या संख्येची टक्केवारी ही 10 टक्क्यांनी घटली असली तरी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मात्र 3.5 टक्क्यांनी वाढली आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे दुचाकी अपघाताचे आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचे आहे.

हेही वाचा - मनसेला धक्के पे धक्का.. सोमवारी प्रदेश उपाध्यक्ष शिवसेनेच्या गोटात; तर आज गटनेता भाजपाच्या गळाला

इंटरसेप्टर वाहनाने होते कारवाई-

हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई संदर्भात माहिती देताना जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, महामार्गावरील वाढते अपघात व त्यात जीव जाणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या लक्षात घेता महामार्गावर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. हेल्मेटमुळे अनेकांचा जीव वाचल्याच्याही घटना आहेत. परंतु, हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाईलाजाने शहर वाहतूक शाखेकडून दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात हेल्मेट न वापरणाऱ्या 1 हजार 242 जणांवर वाहतूक पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेला इंटरसेप्टर हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनात असलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यामुळे हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या चालकाला लांब अंतरावरून सहज डिटेन करता येऊ शकते. वर्षभरात कारवाई केलेल्या 1 हजार 242 जणांना तीन लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 526 जणांनी 26 हजार 300 रुपयांचा दंड भरला आहे, तर 716 दुचाकी चालकांकडे अद्याप दंडाची रक्कम प्रलंबित आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.

हेही वाचा - यूजीसी-नेटच्या तारखा जाहीर; २ ते १७ मे दरम्यान होणार परीक्षा

पोलीस निरीक्षक कुनगर यांचे भावनिक आवाहन-

हेल्मेट वापराविषयी आवाहन करताना पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दुचाकी चालकांना भावनिक आवाहन केले. दुचाकी वापरणारा प्रत्येक मनुष्य हा मध्यमवर्गीय कुटुंबातला असतो. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असते. घरात आई-वडील, पत्नी, मुले अशा सर्वांची जबाबदारी या व्यक्तीवर असते. अशा परिस्थितीत दुचाकीला अपघात झाला; त्यात दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळते. ही परिस्थिती टाळण्यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरायलाच हवे. हेल्मेटच्या वापरामुळे स्वतःचा जीव सुरक्षित राहू शकतो, असे देविदास कुनगर यांनी सांगितले.

लाखोंचा भुर्दंड बसण्यापेक्षा हजार रुपये खर्च करणे सोयीचे-

हेल्मेट वापरणे कसे फायदेशीर आहे, याची माहिती देताना जळगावातील हेल्मेट विक्रेते विजय वाणी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, हेल्मेट वापरणे प्रत्येक दुचाकी चालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बाब आहे. परंतु, नागरिक हेल्मेटच्या वापराकडे गांभीर्याने पाहत नाही. प्रत्येक दुचाकी चालकाने नामांकित कंपनीचे हेल्मेट वापरायला हवे. असे हेल्मेट वापरत असताना जर अपघात झाला तर दुचाकीस्वाराचा 100 टक्के जीव वाचतो. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकाचा दुर्दैवाने अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला, तर दवाखान्यात लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, हजार रुपयांचे हेल्मेट वापरले तर हे संकट टाळता येऊ शकते. अलीकडच्या काळात नागरिकांमध्ये हेल्मेट वापराविषयी बऱ्यापैकी अवेअरनेस आला आहे. परंतु अजूनही अनेक जण हेल्मेट वापरत नाही. त्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट वापरण्याची गरज आहे, असे वाणी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.