जळगाव चोपडा ते अमळनेर या 60 किलोमीटरचा प्रवास पाण्यातून केला आहे. Jalgaon News म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी' असाच काहीसा अनुभव हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत Tapi River झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांच्या बाबतीत संपूर्ण खान्देश करांना आला आहे. Fearing Leopard Attack लताबाई यांनी बिबट्यापासून बचाव करण्यासाठी त्या पाण्यात उडी घेऊन तब्बल अंमळनेरपर्यंत 60 किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करत आपला जीव वाचवला आहे.
तापी पात्रात उडी जळगावच्या कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी या तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. Leopard Attack In Jalgaon चोपडा तालुका म्हटले की, पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित असतो. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडेल ते भयावह दृश्य, पहाते तर काय चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला होता. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल, Jalgaon Chopda Women Jump या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली.
उपचारासाठी दाखल पाण्यात उडी घेतल्याने लताबाई कोळी या पाण्याचा प्रवाहात वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसऱ्या दिवशी नाविकाना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र Primary Health Centre व पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
14 ते 15 तास पाण्यात वाहत होते लताबाई पाण्याच्या प्रवाहात वाहत येताना पाडळसरे धरण ओसंडून वाहत असताना केळीचे खोड हाताला लागल्याने त्याचा आसरा घेत, ती रात्री निम शिवारात काठालगत आसरा घेत पाण्यातच रात्र काढली. नाव चालवणारे शंकर कोळी यांना नजरेस पडले, असता त्यांनी निम येथील ग्रामस्थांच्या मदतीने लताबाई यांना बाहेर काढले. मात्र या पूर्णता गलीत गात्र झालेल्या होत्या. त्यांच्यावर मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले आहे. सुमारे 14 ते 15 तास पाण्यात वाहत, येत केळीच्या खोड्याच्या आधाराने त्या सही सलामत बाहेर पडले आहेत.
तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास करून आपला जीव वाचवण्यासाठी लताबाई या पाण्यात राहिल्या व त्यांनी स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी धडपड केल्याने आज ते सर्वांसमोर आहेत, हे मात्र तितकेच खरे आहे.