ETV Bharat / state

जळगावात कार उलटून एकाचा मृत्यू, तिघे जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे तिघे मित्र गंभीर जखमी झाले.

jalgaon car accident
जळगावात कार उलटून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
author img

By

Published : Feb 16, 2020, 11:00 PM IST

जळगाव - चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे तिघे मित्र गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शहरातील कोल्हे हिल्स परिसरात घडली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जळगावात कार उलटून एकाचा मृत्यू, तिघे जखमी

भूपेंद्र संतोष पाटील (वय 32, रा. जिजाऊनगर, जळगाव) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोमेश पराग गुळवे (रा. भूषण कॉलनी, जळगाव), अलाफ राजेंद्र कुलकर्णी (रा. मुंदडानगर, जळगाव) आणि विजय पाटील अशी जखमींची नावे आहेत. रविवारची सुटी एकत्र घालवण्यासाठी चौघे मित्र सायंकाळी कारने (क्रमांक एमएच 19 बीजे 898) कोल्हे हिल्स परिसरात टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. टेकडीवर काही वेळ घालवल्यानंतर घरी परतत असताना उतारावर हा अपघात घडला.

हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान

कार अलाफ कुलकर्णीची होती. पण घरी परतत असताना भूपेंद्र पाटील कार चालवित होता. कोल्हे हिल्सच्या टेकडीच्या उतारावर समोरून येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात भूपेंद्रचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात भूपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले.

मयत भूपेंद्र पाटील हा खासगी बँकेत नोकरीला होता. तो मूळचा धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी होता. त्यांचे वडील संतोष पाटील हे जळगावातील रुस्तमजी इंग्लिश मीडियम शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला तर मोठा भाऊ दीपक पाटील हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश-

अपघात घडल्यानंतर परिसरातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मयत भूपेंद्रसह इतर तिघा जखमींना खासगी वाहनाने तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर मित्र मंडळी आणि नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. दरम्यान, भूपेंद्रची पत्नी सपना, आई उषा आणि वडील संतोष पाटील यांनी मोठा आक्रोश केला होता.

हेही वाचा - नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; शरद पवारांनी दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.