ETV Bharat / state

उत्तरेतील हिमवृष्टीचा जळगावातील केळीला फटका; प्रतिक्विंटल मागे 200 रुपयांनी घसरले दर - केळींच्या दरात घसरण

उत्तर भारतात सध्या जोरदार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे दिल्लीहून पुढे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जाणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उत्तरेत केळीला मागणी देखील कमी झाली आहे.

jalgaon banana rate
उत्तर भारतातील हिमवृष्टीचा जळगावातील केळीला फटका
author img

By

Published : Jan 30, 2020, 10:43 AM IST

जळगाव - हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यांकडून केळीची मागणी कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर घसरले आहेत. आठवडाभरात केळीचे दर प्रतिक्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरले आहेत. याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

उत्तर भारतातील हिमवृष्टीचा जळगावातील केळीला फटका

उत्तर भारतात सध्या जोरदार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे दिल्लीहून पुढे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जाणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उत्तरेत केळीला मागणी देखील कमी झाली आहे. या कारणांमुळे केळीचे दर झपाट्याने घसरले आहेत. आठवडाभरातच केळीचे दर प्रतिक्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील 'केळीचे हब' म्हणून लौकिक असलेल्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने केळीला 1400 रुपये प्रतिक्विंटल व फरक 12 रुपये असा एकूण 1484 रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला होता. मात्र, आठवडाभरातच केळीचे दर खाली आले आहेत. सध्या केळीला 1200 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल व फरक 10 ते 12 रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या जळगावसह शेजारील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून केळीला मागणी कायम आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने केळीला चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. परंतु, व्यापारी बाजारात लिलावावेळी केळीला कमी बोली लावतात. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने तो विकावाच लागतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Intro:जळगाव
हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यांकडून केळीची मागणी कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर घसरले आहेत. आठवडाभरात केळीचे दर प्रतिक्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरले आहेत. याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. Body:उत्तर भारतात सध्या जोरदार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीमुळे दिल्लीहून पुढे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जाणारे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून उत्तरेकडील राज्यांमध्ये केळी निर्यात करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उत्तरेत केळीला मागणी देखील कमी झाली आहे. या कारणांमुळे केळीचे दर झपाट्याने घसरले आहेत. आठवडाभरातच केळीचे दर प्रतिक्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील 'केळीचा हब' म्हणून लौकिक असलेल्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने केळीला 1400 रुपये प्रतिक्विंटल व फरक 12 रुपये असा एकूण 1484 रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला होता. मात्र, आठवडाभरातच केळीचे दर खाली आले आहेत. सध्या केळीला 1200 ते 1250 रुपये प्रतिक्विंटल व फरक 10 ते 12 रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.Conclusion:सध्या जळगावसह शेजारील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून केळीला मागणी कायम आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने केळीला चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. परंतु, व्यापारी बाजारात लिलावावेळी केळीला कमी बोली लावतात. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने तो विकावाच लागतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी केळीच्या दराविषयी देत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.