ETV Bharat / state

DGCA च्या परवानगी अभावी जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता, व्यापारी वर्गात नाराजगी - ट्रु-जेट

जळगाव शहरात दुसऱ्यांदा सुरू होणाऱ्या विमानसेवेचा मुहूर्त हुकण्याची चिन्हे दिसत आहेत. 'ट्रु-जेट' कंपनीतर्फे १७ जुलैपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार होती, मात्र नागरी विमानवाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून अद्यापही काही परवानग्या न मिळाल्याने ही विमानसेवा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील नागरिक व व्यापारीवर्गातून यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

DGCA च्या परवानगी अभावी जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता
author img

By

Published : Jul 6, 2019, 9:56 AM IST

जळगाव - जळगावची विमानसेवा दीड वर्षापूर्वीच सुरू होऊन खंडित झाल्यानंतर हैद्राबादच्या ट्रू-जेट कंपनीला जळगावातून विमानसेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ट्रू-जेट कंपनीकडून 'अहमदाबाद ते जळगाव' व 'जळगाव ते मुंबई' या दोन ठिकाणी विमानसेवा देणार आहे, परंतु ट्रू-जेटला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) अद्यापही काही परवानग्या मिळालेल्या नाहीत. यामुळे ही विमानसेवा रखडण्याची शक्यता आहे.

जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता

१५ दिवसांपूर्वीच ट्रू-जेट कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जळगावात येऊन उद्योजक, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कंपनीच्या योजनांची माहिती दिली होती. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १७ जुलैपासून 'अहमदाबाद-जळगाव-मुंबई' अशी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कंपनीने जळगाव विमानतळावर १५ कर्मचाऱ्यांची नेमणूकदेखील केली होती.

या कर्मचाऱ्यांना हैद्राबाद येथे नेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ट्रू-जेट कंपनीच्या रचनेनुसार विमानतळावरील पूर्वीच्या विभागात फेरफार करण्यात आले आहेत. ट्रू-जेटने विमानतळावर संगणक कक्ष तयार केला असून, प्रशिक्षण घेतलेले विमानतळ व्यवस्थापक लवकरच जळगावात दाखल होणार आहेत. विमानात सामानाची चढ-उतार करणारा लोडर-अनलोडर स्टाफ या आधीच दाखल झाला आहे. विमानतळावर आवश्यक त्या सुविधादेखील करण्यात येत आहे. दुसरीकडे हैदराबाद येथे कंपनीच्या विमानांसाठी मार्गदेखील निर्माण करण्यात आला आहे.

jalgaon airlines might be hanging out
जळगावची विमानसेवा रखडण्याची शक्यता

दरम्यान नागरी विमानवाहतूक महासंचालनालय च्या परवानग्या वगळता इतर सर्व बाबींची पूर्तता ट्रू जेट कंपनीतर्फे करण्यात आली आहे व उरलेल्या परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून त्या प्राप्त झाल्यानंतर विमानसेवेची तारीख जाहीर करण्यात येईल. विमानसेवा सुरू होण्याबाबत कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरू होणार म्हणून चर्चा चालली असतानाच अनेक अडचणी येत असल्याने जळगाव शहरातील नागरिक व व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Intro:जळगाव
शहरात दुसऱ्यांदा सुरू हाेणाऱ्या विमानसेवेचा मुहूर्त हुकण्याची चिन्हे अाहेत. ट्रू-जेट या कंपनीतर्फे १७ जुलैपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार अाहे. मात्र, डीजीसीएच्या (नागरी उड्डयन संचालनालय) परवानग्या अद्याप मिळालेल्या नसल्याने नियाेजित विमानसेवा सुरू हाेणार नसल्याची माहिती कंपनीच्या अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली अाहे. दरम्यान, परवानग्या वगळता इतर सर्व बाबींची पूर्तता ट्रू जेट कंपनीतर्फे करण्यात अाली अाहे.Body:गेल्या दीड वर्षापासून जळगावची विमानसेवा सुरू हाेऊन खंडित झालेली अाहे. आता हैद्राबादच्या ट्रू-जेट कंपनीला जळगावातून विमानसेवा देण्याची परवानगी मिळाली अाहे. ट्रू-जेट कंपनी अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते मुंबई या दाेन ठिकाणी विमानसेवा देणार अाहे. त्यासाठी गेल्या १५ दिवसांपूर्वी ट्रू-जेट कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जळगावात येऊन उद्याेजक, व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कंपनीच्या याेजनांची माहिती दिली हाेती. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १७ जुलैपासून अहमदाबाद-जळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्यानुसार कंपनीने जळगाव विमानतळावर १५ जणांची नेमणूक देखील केली. या कर्मचाऱ्यांना हैद्राबाद येथे नेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात अाले अाहे. विमानतळावर ट्रू-जेट कंपनीच्या रचनेनुसार पूर्वीच्या विभागात फेरफार करण्यात अाले अाहे. विमानतळावरील एक खाेली ट्रू-जेटने ताब्यात घेऊन त्यात संगणक कक्ष तयार केला अाहे. दरम्यान, प्रशिक्षण घेऊन विमानतळ व्यवस्थापक लवकरच जळगावात दाखल हाेणार अाहेत. विमानात सामानाची चढ-उतार करणारा लाेडर-अनलाेडर स्टाफ आधीच दाखल झाला अाहे. तर दुसरीकडे हैदराबाद येथे विमान कंपनीच्या रूटची तयारी करण्यात अाली अाहे. तसेच विमानतळावर सुविधा देखील करण्यात येत अाहे.Conclusion:काही परवानग्या नाहीत-

ट्रू-जेट कंपनीला अहमदाबाद-जळगाव-मुंबई या रूटसाठी नागरी उड्डयन संचालनालय (डीजीसीए)च्या काही परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत. त्याची प्रक्रिया सुरू अाहे. त्या प्राप्त झाल्यानंतर विमानसेवेची तारीख जाहीर करण्यात येईल. तूर्त १७ जुलैला हाेणारी सेवा सुरू हाेणार नाही. विमानसेवा सुरू हाेण्याबाबत कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, विमानसेवा सुरू होणार, सुरू होणार म्हणून चर्चा चालली आहे. परंतु, ही सेवा सुरू होण्यापूर्वी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.