ETV Bharat / state

जळगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बनलाय मृत्यूचा सापळा - जळगाव जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बनलाय मृत्यूचा सापळा

धुळे, जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ खूपच धोकादायक झाला आहे. या महामार्गाचे धुळे जिल्ह्यातील फागणे ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे.

जळगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बनलाय मृत्यूचा सापळा
author img

By

Published : Nov 20, 2019, 12:42 PM IST

जळगाव- जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप लोकांचे हकनाक बळी जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मात्र, कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

जळगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बनलाय मृत्यूचा सापळा

हेही वाचा- 'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'

धुळे, जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ खूपच धोकादायक झाला आहे. या महामार्गाचे धुळे जिल्ह्यातील फागणे ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शेकडो निरअपराध नागरिकांना रस्त्यावरील जीवघेण्या वाहतुकीमुळे प्राणाला मुकावे लागले आहे. हा महामार्ग अतिशय अरूंद झाला आहे. त्यातच जीवघेण्या खड्ड्यांमुळे याठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीसह चौपदरीकरणाची मागणी वाहनधारकांकडून वारंवार होत आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला काही एक फरक नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकभावना तीव्र झाल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम फागणे ते तरसोद तसेच तरसोद ते चिखली या दोन टप्प्यात घेण्यात आले आहे. १५० किलोमीटर अंतराच्या कामासाठी केंद्र सरकारने २ हजार ६९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचा प्रश्न मिटला आहे. आता तिसऱ्यांदा रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तरीही सध्या फागणे ते तरसोद रस्त्याचे काम रखडले आहे. फागणे तरसोद कॉरिडॉर प्रायव्हेट लिमिटेड नावाने अ‌ॅग्रो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि एमबीएल कंपनीने जॉईंट व्हेंचरने या महामार्गाच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. सुरुवातीला वेगाने सुरू असलेले या रस्त्याचे काम आता रखडले आहे. फागणे ते तरसोद या ८७.३ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या मदतीने १ हजार २१ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली. या रस्त्याला मुकटी, पारोळा, जळगाव येथे बायपास रस्ते असून पारोळा शहराबाहेर एक टोल प्लाझा प्रस्तावित आहे. तसेच ठिकठिकाणी एकूण ३३ किलोमीटरचे सर्व्हिस रस्ते आहेत. चौपदरीकरणाचे काम रखडलेले असताना खराब झालेल्या महामार्गाची दुरुस्ती देखील होत नाही. परंतु, ठेकेदार दुरुस्तीचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे सगळे काम पूर्ण झाले तर पश्चिम विदर्भ तसेच खान्देशवासीयांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. मात्र, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराची इच्छाशक्तीच नसल्याने घोडे अडले आहे.

अपघाताची आकडेवारी-

  • जानेवारी ते ऑक्टोबर 2019 दरम्यान, तब्बल 96 मोठे अपघात या महामार्गावर घडले असून त्यात 110 जणांचे बळी गेले आहेत. बळींची संख्या महिनानिहाय विचारात घेतली तर प्रत्येक महिन्याला 10 ते 15 बळी या महामार्गाने घेतले आहेत.
  • जानेवारी ते ऑक्टोबर 2019 दरम्यान घडलेल्या 66 अपघातांमध्ये 134 जण गंभीर जखमी होऊन त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे.
  • याच काळात घडलेल्या किरकोळ स्वरुपाच्या 28 अपघातांमध्ये 59 जण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे 17 भीषण अपघातांमध्ये लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
  • गेल्या ५ महिन्याच्या काळात या महामार्गावरील धरणगाव तालुक्यातील एकलग्न ते बांभोरी गावांदरम्यान 22 ते 25 भीषण अपघात घडले आहेत. त्यात 20 जणांचे बळी गेले आहेत.

Intro:जळगाव
जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप लोकांचे हकनाक बळी जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मात्र, कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.Body:धुळे, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा खूपच धोकादायक झाला आहे. या महामार्गाचे धुळे जिल्ह्यातील फागणे ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शेकडो निरपराध नागरिकांना रस्त्यावरील जीवघेण्या वाहतुकीमुळे प्राणाला मुकावे लागले आहे. हा महामार्ग अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच जीवघेण्या खड्ड्यांमुळे याठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीसह चौपदरीकरणाची मागणी वाहनधारकांकडून वारंवार होत आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला काहीएक फरक नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकभावना तीव्र झाल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम फागणे ते तरसोद तसेच तरसोद ते चिखली या दोन टप्प्यात घेण्यात आले आहे. १५० किलोमीटर अंतराच्या कामासाठी केंद्र सरकारने २ हजार ६९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचा प्रश्न मिटला आहे. आता तिसऱ्यांदा रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तरीही सध्या फागणे ते तरसोद रस्त्याचे काम रखडले आहे. फागणे तरसोद कॉरिडॉर प्रायव्हेट लिमिटेड नावाने अॅग्रो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि एमबीएल कंपनीने जॉईंट व्हेंचरने या महामार्गाच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. सुरुवातीला वेगाने सुरु असलेले या रस्त्याचे काम आता रखडले आहे. फागणे ते तरसोद या ८७.३ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या मदतीने १ हजार २१ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली. या रस्त्याला मुकटी, पारोळा, जळगाव येथे बायपास रस्ते असून पारोळा शहराबाहेर एक टोल प्लाझा प्रस्तावित आहे. तसेच ठिकठिकाणी एकूण ३३ किलोमीटरचे सर्व्हिस रस्ते आहेत. चौपदरीकरणाचे काम रखडलेले असताना खराब झालेल्या महामार्गाची दुरुस्ती देखील होत नाहीये. परंतु, ठेकेदार दुरुस्तीचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत आहे.Conclusion:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे सगळे काम पूर्ण झाले तर पश्चिम विदर्भ तसेच खान्देशवासीयांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. मात्र, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराची इच्छाशक्तीच नसल्याने घोडे अडले आहे.

बाईट: दीपक राजपूत, वाहनधारक (टी शर्ट)
प्रतिभा पाटील, नागरिक
डॉ. मनीष कापडणे, ठेकेदार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.