ETV Bharat / state

VIDEO : जळगाव जिल्ह्यात अनोखा विवाह.. मृत वडिलांच्या पुतळ्याला साक्षी मानत मुलीने घेतले सात फेर - प्रियांका पाटील लग्न सारोळा

पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे एका मुलीने तिच्या लग्नात आपल्या वडिलांचा पुतळा तयार केला व त्यासमोरच सात फेरे घेवून त्यांच्या आशीर्वाद घेतला आहे. वडिलांचा पुतळा तयार करून तिने त्यांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या लग्न सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे.

father statue girl marriage sarola
लग्न वडील पुतळा सारोळा
author img

By

Published : Dec 12, 2021, 8:56 PM IST

जळगाव - पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे एका मुलीने तिच्या लग्नात आपल्या वडिलांचा पुतळा तयार केला व त्यासमोरच सात फेरे घेवून त्यांच्या आशीर्वाद घेतला आहे. वडिलांचा पुतळा तयार करून तिने त्यांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या लग्न सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे.

माहिती देताना प्रियांका पाटील

हेही वाचा - Maha Vikas aghadi : आगामी सर्व निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढवणार - गुलाबराव पाटील

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील माजी सैनिक भागवत धोंडू पाटील यांच्या पत्नी मंगला आणि 4 मुली पूनम, भाग्यश्री, प्रियंका व शुभांगी असा परिवार आहे. भागवत पाटील यांनी लष्करात कर्तव्य बजावून देशसेवा केली. १९९७ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. या काळात मात्र मुलींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. त्यांनी मुलींना वाढविण्यात त्यांच्या पालनपोषणात कुठलीच कमी ठेवली नाही. पूनमने पदवी घेतली, भाग्यश्रीने एमएबीएड, तर प्रियंका ही शिक्षण पूर्ण करून वनविभागात अधिकारी झाली. लहान मुलगी शुभांगी आता एमकॉम करत आहे. पूनम व भाग्यश्री यांचा विवाह सोहळाही भागवत पाटील यांनी थाटात पार पाडला. तिसर्‍या क्रमांकाची मुलगी प्रियंका हिचेही लग्न ठरले. तिचा सोहळाही मनाप्रमाणे थाटामाटात पार पाडायचा, असे त्यांचे ठरले होते. मात्र, नंतर एक दुखद घटना घडली. ५ ऑगस्ट २०२० मध्ये भागवत पाटील यांचे कोरोनाने निधन झाले आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. चारही मुलींचे पितृछत्र हरविले.

आपले वडील हे जगातून निघून गेले असले तरी आपल्यासाठी हयातच आणि आपल्या सोबतच असल्याच्या भावना मात्र मुलींच्या मनात कायम आहेत. वडिलांनी ठरविल्याप्रमाणे लग्न व्हावे म्हणून प्रियंकाने वडिलांची कमतरता दूर करण्यासाठी नाशिकच्या कारागिराकडून सिलिकॉनचा चांदीचा मुलामा दिलेल्या खुर्चीत भागवत पाटील यांचा हुबेहुब पुतळा बनवून घेतला. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. वडिलांचा पुतळा असला तरी आपले वडील प्रत्यक्षात उपस्थित आहेत, असे मानून त्यांच्यासमोर हळदीपासून ते विदाईपर्यंतचे सर्व कार्यक्रम झाले.

विवाहाच्या वेळी मंडपात प्रियंकाने वडिलांच्या पुतळ्यासमक्ष सातफेरे घेवून त्यांचे आशीर्वादही घेतले. बाप - लेकीच्या नात्याच्या अनोख्या भावबंधातून साकार झालेला या अनोख्या सोहळ्याला उपस्थित प्रत्यक्षदर्शींचे डोळे तर पाणावले होते. त्याचबरोबर लग्नाच्या अक्षदांबरोबरच उपस्थितांनी प्रियंकावर कौतुकाच्या अक्षदा टाकत तिला सुखी राहण्याचे आशीर्वादही दिले. वडील हे प्रत्येकाच्या कुटुंबातला, आयुष्यातला बापमाणूस असतो, अशी वडिलांबद्दची माहिती प्रियंकाने वेगळ्या पद्धतीने समाजासमोर आणली.

हेही वाचा - जळगावातील शिवसैनिक आक्रमक, निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.