ETV Bharat / state

जळगावात सहाय्यक पोलीस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात - एमआयडीसी पोलीस

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे (वय 38) यांना 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक संदीप हजारे
पोलीस निरीक्षक संदीप हजारे
author img

By

Published : Dec 19, 2020, 9:44 PM IST

Updated : Dec 19, 2020, 9:52 PM IST

जळगाव - येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अशोक हजारे (वय 38) यांना 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-

ज्या पोलीस ठाण्यात संदीप हजारे हे कर्तव्य बजावत होते, त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एवढेच नव्हे तर, त्याच पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्यांना सहकाऱ्यांच्या पहाऱ्यात आरोपी म्हणून रात्र काढण्याची वेळ लाचखोर वृत्तीमुळे आली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली. काल, शुक्रवारी बोदवडमध्ये तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी अशा तिघांना 2 लाखांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली होती. या कारवाईला काही तास उलटत नाही तोच जळगावात पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितल्याने कारवाई झाली.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील 33 वर्षीय तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी एका वादाच्या प्रकरणात त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांनी तक्रादारकडून 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटकडे आपली तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात सापळा रचला होता. त्यात संदीप हजारे यांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई-

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकातील पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक मनोज पाटील, किरण अहिरराव यांनी केली.

दिवसभर चालली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया-

संदीप हजारे यांनी तक्रारदाराकडून गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सर्वच बाजू, तांत्रिक मुद्दे तपासले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभर चालली.

कारवाई होताच अंगावरील वर्दी उतरवली-

संदीप हजारे यांनी ऑनड्युटी लाच मागितली. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगावरील वर्दी उतरवली. त्यामुळे हजारे यांनी दुसरे कपडे मागवले. नंतर पुढची कार्यवाही करण्यात आली.

कोठडीचे सीसीटीव्ही तपासले जाणार-

संदीप हजारे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. लाच लाच मागितल्याने याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. धक्कादायक बाब म्हणजे, याच पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपी म्हणून त्यांना रात्रभर ठेवण्यात आले. ते अधिकारी असल्याने त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये, एखाद्या सर्वसाधारण आरोपीप्रमाणे त्यांना रात्रभर कोठडीतच ठेवले की नाही? हे पाहण्यासाठी कोठडीचे सीसीटीव्ही दुसऱ्या दिवशी तपासले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

हेही वाचा- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

Last Updated : Dec 19, 2020, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.