ETV Bharat / state

जळगावात विद्यार्थींनीचा चक्कर येवून पडल्याने जागीच मृत्यू - Jalgaon update

विद्यार्थीनी मिदहत फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जीना चढताना अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Dec 28, 2020, 3:23 PM IST

जळगाव - शहरातील ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीचा चक्कर येवून पडल्याने अकस्मात मृत्यू झाला. मिधहत फातेमा नईम शेख (१७ वर्ष), असे मुलीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. शाळेत वर्गात जाण्यासाठी जिना चढतांना विद्यार्थींनीला चक्कर आला होता.

जिना चढतांना आला चक्कर-

मिदहत फातेमा नईम शेख ही मुलगी शहरातील हॉजी नूर मोहंम्मद चाचा उर्दू हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. आज सकाळी ११ वाजता तिच्या आईने तिला शाळेत दुचाकीने सोडले. विद्यार्थीनी मिदहत फातेमा ही वर्गात जाण्यासाठी जीना चढताना अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. खासगी रूग्णालयात दाखल केले असता तीची प्रकृती गंभीर झाल्याने तीला जिल्हा शासकीय महाविद्यालयात रवाना केले. यावेळी वैद्यकिय अधिकारी यांनी मिदहत फातेमा हीला मृत घोषीत केले.

दहावर्षांपूर्वी बहिण बिरजीसचा चक्कर येवून मृत्यू-

दहावर्षांपूर्वी फातेमा यांची मोठी बहिण बिरजीस फातेमा हीचा देखील बिग बाजार येथे जीना चढताना याच पध्दतीने चक्कर येवून पडून मृत्यू झाला होता. दोन्ही बहिणी एका शाळेत शिकल्या. वडील नईम शेख हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मृत मिदहत फातेमा हिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा- 'बायकांच्या पदराआडूनची खेळी, तुमच्यावर उलटणार, आम्ही नोटिसीला घाबरत नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.