ETV Bharat / state

धक्कादायक : झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून पतीची आत्महत्या - पाचोरा ग्रामीण रुग्णालय

पत्नीस ठार करून गळफास घेणारा सतीश हा मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

पत्नीचा गळा आवळून पतीची आत्महत्या
पत्नीचा गळा आवळून पतीची आत्महत्या
author img

By

Published : Oct 30, 2021, 1:02 PM IST

जळगाव - झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यावर, आरोपी पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सावखेडा बुद्रुक येथे घडली आहे. गायत्री सतीश परदेशी (वय ३२) असे मृत पत्नीचे तर सतीश धनसिंग परदेशी (वय ३८) असे मृत पतीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

झोपेत असलेल्या पत्नीचा पहाटे केला खून -

पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे सतीश व गायत्री परदेशी हे दाम्पत्य सहा वर्षांचा मुलगा व चार वर्षांच्या मुलीसह राहत होते. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) रात्री संपूर्ण कुटुंब झोपी गेल्यानंतर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पहाटे ३ वाजताच्या सुमारास सतीश परदेशी याने गाढ झोपेत असलेली पत्नी गायत्री हिचा झोपेतच गळा आवळून खून केला. त्यानंतर तो घराबाहेर आरडाओरड करून पळून जात होता. तेव्हा त्याच्या किंचाळण्याने शेजारी राहणारा त्याचा लहान भाऊ संदीप परदेशी जागा झाला. त्याने सतीशला पकडून, तू एवढ्या रात्री कुठे जात आहेस व आरडाओरड का करत आहे? अशी विचारणा केली. त्यावर सतीशने मी पत्नी गायत्रीचा गळा दाबून खून केला आहे, असे सांगत संदीपच्या हाताला झटका देऊन पळ काढला. नंतर संदीपने घरात जाऊन बघितले तेव्हा गायत्री मृत अवस्थेत तर दोघे मुले झोपलेले दिसले.

संशयित पतीने घेतला गळफास -

पत्नीचा खून केल्यानंतर सतीश परदेशी याने गावाबाहेर जाऊन माजी सरपंच गोकुळसिंग परदेशी यांच्या शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने झाडावर चढत अंगातल्या स्वेटर व नाईट पँटचे दोन तुकडे करून गळ्याभोवती गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

सतीश मनोरुग्ण असल्याचा संशय -

पत्नीस ठार करून गळफास घेणारा सतीश हा मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मयत पती व पत्नी यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

नुकतेच झाले होते सतीशच्या वडिलांचे निधन -

सतीश व संदीप परदेशी यांचे वडील धनसिंग परदेशी यांचे रविवारी (२४ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. शुक्रवारीच सावखेडा येथून त्यांच्या अस्थी नाशिक येथे नेण्यात येणार होत्या. मात्र, तत्पूर्वी ही घटना घडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.