ETV Bharat / state

कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खुनाचा चौथ्या दिवशी उलगडा; पैशाच्या वादातून हत्या - जळगाव जिल्हा लेटेस्ट न्यूज

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४) व त्यांच्या पत्नी आशाबाई पाटील (वय ४७) या दाम्पत्याचा खुनाचा चौथ्या दिवशी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खुनाचा चौथ्या दिवशी उलगडा

author img

By

Published : Apr 26, 2021, 10:55 PM IST

जळगाव - तालुक्यातील कुसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४) व त्यांच्या पत्नी आशाबाई पाटील (वय ४७) या दाम्पत्याचा खुनाचा चौथ्या दिवशी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पाटील दाम्पत्याकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशांची परतफेड करणे अशक्य झाल्याने, शिवाय त्यांच्या घरातून पैसे व दागिने चोरण्याच्या उद्देशाने हे हत्याकांड घडले असून, तशी कबुली आरोपींनी दिली आहे.

देवीदास नामदेव श्रीनाथ उर्फ जलेबीवाला (वय ४०, मूळ रा. शेगाव, हल्ली रा. कुसुंबा), सुधाकर रामलाल पाटील (वय ४५, रा. चिंचखेडा, ता. जामनेर) व अरुणाबाई गजानन वारंगने (वय ३०, रा. कुसुंबा) असे अटक केलेल्या तिन्ही संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या हत्याकांडाच्या तपासासंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे उपस्थित होते.

पैशाच्या देवाण-घेवाणीतून हत्या

अरुणाबाई गृहिणी आहे. देवीदास हा कुसुंबा परिसरात जलेबीची गाडी लावतो. तर सुधाकर हा शेती करतो. मृत आशाबाई या अनेक लोकांना १० ते २० टक्के व्याजाने पैसे देत होत्या. त्यांनी अरुणाबाईला १० ते १२ लाख व सुधाकर याला २० हजार रुपये व्याजाने दिले होते. या पैशांची परतफेड करणे जिकरीचे झाल्याने, शिवाय पाटील दाम्पत्याच्या घरातून पैसे व सोने-चांदीचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने तिन्ही आरोपींनी दोघांचा खून करण्याचा बेत आखला होता.

आरोपींनी अशी केली हत्या

२१ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेनंतर देवीदास व अरुणाबाई हे दोघे आशाबाई यांच्या घरी गेले. यावेळी अरुणाबाई हिने त्यांच्या घरी जेवण देखील केले. आशाबाई व अरुणाबाई खालच्या मजल्यावरील बेडरुमध्ये गप्पा मारत असताना देवीदास याने मुरलीधर पाटील यांना छतावर घेऊन जात दोरीने त्यांचा गळा आवळला. अचानक झालेल्या या हल्ल्याचा प्रतिकार देखील मुरलीधर यांना करता आला नाही. ते बेशुद्ध झाले. याचवेळी सुधाकर हा देखील पाटील यांच्या घरी आला. यानंतर देवीदास व सुधाकर हे दोघे छतावर गेले. सुधाकर याने मुरलीधर यांचे पाय पकडून ठेवले तर देवीदास याने पुन्हा एकदा गळा आवळून त्यांना ठार केले. यानंतर दोघे पुन्हा खालच्या मजल्यावर आले. सुधाकर जिन्यात बसून राहिला. तर देवीदास बेडरुमध्ये गेला. यावेळी देवीदासने आशाबाई बसलेल्या खुर्चीच्या मागे जाऊन त्यांचा दोरीने गळा आवळण्यास सुरुवात केली. यावेळी अरुणाबाईने उशीने आशाबाईचे तोंड दाबले. तर सुधाकरने देखील पाय धरुन ठेवले होते. अवघ्या काही मिनिटातच या तिघांनी पाटील दाम्पत्याचा खून केला. तिघांनी त्यांच्या घरातून ८७ हजार ७०० रुपयांची रोकड व आशाबाईच्या अंगावरील दागिने चोरून नेत पळ काढला होता.

कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खुनाचा चौथ्या दिवशी उलगडा

अशी झाली गुन्ह्याची उकल

एलसीबी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक सातत्याने या गुन्ह्यावर काम करत होते. पोलिसांनी सर्वात आधी गोपनीय माहिती काढली. परिसराचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डवरील आरोपी तपासले. गोपनीय माहितीच्या आधारावर सुधाकर, देवीदास व अरुणाबाई यांना तीन दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, ठोस पुरावे नसल्यामुळे तसेच संशयित पोलिसांची दिशाभूल करत असल्यामुळे गुन्ह्याची उकल झाली नव्हती. पण तांत्रिक माहितीवरुन या तिघांचे घटनेच्या दिवसाचे लोकेशन एकच आले. तसेच काही लोकांनी सुधाकर याला घटनेच्या दिवशी पाटील यांच्या घराकडून दुचाकीने जाताना पाहिले होते. यावरुन संशय पक्का झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटे एकाच वेळी तिघांना पुन्हा ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा - नाशिकला निश्चित सूत्रानुसार रेमडेसिवीर वितरण करावे- छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.