ETV Bharat / state

लंगडाआंबा अभयारण्यात शिकार्‍यांचा वनविभागाच्या अधिकार्‍यांवर गोळीबार - लंगडाआंबा अभयारण्य

लंगडाआंबा अभयारण्यात मध्यप्रदेशातून काही शिकारी शस्त्रांसह वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर जामन्या वनक्षेत्राचे आरएफओ अक्षय मेहेत्रे व त्यांचे सहकारी वनरक्षक, वनमजूर कारवाईसाठी पोहोचले. त्यांनी शिकाऱ्यांची प्राथमिक विचारपूस केली. तेव्हा शिकाऱ्यांनी ओळख लपवत आम्ही वन जमिनी तयार करण्यासाठी आल्याचे सांगितले.

hunters-shoot-at-forest-department-officials-at-langadaamba-sanctuary

author img

By

Published : May 5, 2020, 5:19 PM IST

जळगाव - वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात आलेल्या 25 ते 30 शिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्ह्यातील लंगडाआंबा वनक्षेत्रात घडली. स्वतःचा बचाव करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर म्हणून हवेत गोळीबार केल्याने शिकारी पळून गेले. या सिनेस्टाईल घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- कोरोना विषाणूवर प्रभावी प्रतिजैवक विकसित केल्याचा इस्त्रायलचा दावा

लंगडाआंबा अभयारण्यात मध्यप्रदेशातून काही शिकारी शस्त्रांसह वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर जामन्या वनक्षेत्राचे आरएफओ अक्षय मेहेत्रे व त्यांचे सहकारी वनरक्षक, वनमजूर कारवाईसाठी पोहोचले. त्यांनी शिकाऱ्यांची प्राथमिक विचारपूस केली. तेव्हा शिकाऱ्यांनी ओळख लपवत आम्ही वन जमिनी तयार करण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र, अशा रितीने वन जमिनीवर अतिक्रमण करणेदेखील बेकायदेशीर असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याच दरम्यान, शिकाऱ्यांकडे शस्त्र दिसल्याने वाद विकोपाला गेला. तेव्हा शिकार्‍यांनी आपल्याकडील बंदुकीतून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दिशेने गोळीबार केला. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी देखील प्रत्युत्तरात स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत काही राऊंड फायर केल्यानंतर शिकारी नदीतून पळाले. या घटनेत सुदैवाने आरएफओ अक्षय मेहेत्रे व त्यांचे सहकारी बचावल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसआरपी प्लाटून लंगडाआंबाच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी घडतात प्रकार-
सातपुडा पर्वतातील दुर्गम पर्वतरांगांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वन विभागाचे अधिकारी आणि आदिवासींमध्ये वादाचे असे प्रकार घडतात. उन्हाळ्यात मध्य प्रदेशातील अनेक आदिवासी वनजमिनी तयार करण्यासाठी अतिक्रमण करतात. त्याला वनविभागाकडून विरोध झाल्यास अनेकदा टोकाचे वाद होतात. वनजमिनीवर अतिक्रमण करणारे हे आदिवासी वन्य प्राण्यांची देखील शिकार करत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वन जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे वन्यजीव नाशिक विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.