ETV Bharat / state

जळगाव: खासगी रुग्णालयाकडून बिलाकरता नातेवाईकांना मृतदेह देण्यास टाळाटाळ - private hospital loot in Jalgaon

खासगी रुग्णालयात कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून लूट होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी नातेवाईकांना रुग्णालयाचे लेखापरीक्षण करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

रुग्णालयात गोंधळाची स्थिती
रुग्णालयात गोंधळाची स्थिती
author img

By

Published : Sep 25, 2020, 8:30 PM IST

जळगाव - राज्य सरकारने कोरोनासाठी अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयाने पैशांसाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शहरात शुक्रवारी घडला. या प्रकारानंतर मृताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप केला. जिल्हा शल्यचिकित्सकांनी हस्तक्षेप केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणी फॅक्टरीतील 45 वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला नातेवाईकांनी जळगावात एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी 11 सप्टेंबरला दाखल केले. गुरुवारी (24 रोजी) दुपारी साडेचार वाजता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ही माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना कळविली. त्यामुळे जळगाव शहरात राहणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्यू का झाला? याचे कुठलेही ठोस कारण रुग्णालय प्रशासनाने दिले नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. दोन दिवसांपूर्वी रुग्ण चांगला होता, मग त्याचा मृत्यू झाला कसा? असा सवाल नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला विचारला. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर साशंकता निर्माण झाली. बिल बाकी आहे, असे सांगून मृतदेह देणार नाही अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता नातेवाईक मृतदेह घेण्यास रुग्णालयात गेले. त्यांना 1 लाख 11 हजार रुपयांचे बिल बाकी आहे, ते आधी भरा, असा निरोप रुग्णालयाने दिला. मात्र, आधीच ऑनलाईन 2 लाख 44 हजार तसेच 50 हजार रुपये रोख भरल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आणखी पैसे का द्यावे, असे मृताच्या भावाने विचारले. त्यावर रुग्णालयाने संशयास्पद असलेले बिल नातेवाईकांना दिले. त्यात आधी भरलेले 2 लाख 44 हजार व रोख 50 हजार जमा केल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे नातेवाईकांचा आणखीनच संताप झाला. यात औषधी व इंजेक्शनदेखील डॉक्टरांना बाहेरून आणून दिले असल्याची माहिती नातेवाईकांनी सांगितली. हा वाद वाढल्याने रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली.

नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांनी घडलेल्या प्रकारविषयी तक्रार अर्ज द्या, रुग्णालयाचे लेखापरीक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले. रुग्णालयाने नमते घेत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकारचे लेखापरीक्षण करावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बाजू मांडण्यास नकार दिला. या प्रकारामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयात अनागोंदी सुरू असल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.