ETV Bharat / state

जळगावातील नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीची आहे सर्वदूर ख्याती; 75 वर्षांचा लाभलाय मंदिराला इतिहास - ganeshotsav 2021

जळगाव शहरातील बळीराम पेठेत तहसील कार्यालयाच्या आवारात लाकडी गणपतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या मंदिराला सुमारे 75 वर्षांपेक्षा अधिक काळाचा सुवर्ण इतिहास लाभला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लाकडी गणपतीची सर्वत्र ख्याती आहे.

lakdi ganpati jalgaon
जळगाव लाकडी गणपती
author img

By

Published : Sep 14, 2021, 4:18 PM IST

Updated : Sep 14, 2021, 5:44 PM IST

जळगाव - सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्याचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने आपल्या प्रेक्षकांसाठी जळगाव शहरातील प्रसिद्ध 'लाकडी गणपती'ची महती सांगणारा हा खास रिपोर्ट सादर केला आहे. जाणून घेऊया अनोख्या लाकडी गणपतीची सविस्तर माहिती...

माहिती देताना स्थानिक भाविक

हेही वाचा - डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच व्यासपीठावर असलेले पद्मालय तीर्थक्षेत्र! वाचा इतिहास...

जळगाव शहरातील बळीराम पेठेत तहसील कार्यालयाच्या आवारात लाकडी गणपतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या मंदिराला सुमारे 75 वर्षांपेक्षा अधिक काळाचा सुवर्ण इतिहास लाभला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लाकडी गणपतीची सर्वत्र ख्याती असून, भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक गणेश चतुर्थीला याठिकाणी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. नवस फेडण्यासाठी देखील याठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. येथे येणारा प्रत्येक भाविक मोठ्या भक्तिभावाने गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असतो.

  • असे पडले 'लाकडी गणपती' हे नाव-

लाकडी गणपतीचा इतिहास अतिशय रंजक आहे. पूर्वी याठिकाणी भलेमोठे एक चिंचेचे झाड होते. झाडाच्या ढोलीचा आकार गणपतीच्या सोंडेप्रमाणे होता. झाडाच्या ढोलीत जणूकाही गणपतीची मूर्तीच विराजमान आहे, असा भास पाहणाऱ्याला व्हायचा. म्हणून अनेक जण याठिकाणी हात जोडून नमस्कार करायचे. पाहता पाहता याठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी स्थानिक नागरिक दर्शनाला येऊ लागले. एखाद्या मंदिराप्रमाणे इथलं वातावरण प्रसन्न वाटायचे, म्हणून आबालवृद्ध दर्शन घेतल्यावर झाडाच्या आजूबाजूला बसायचे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगायच्या. पुढे भाविकांची श्रद्धा वाढल्याने या ठिकाणी झाडाला चबुतरा बांधण्यात आला. मग लाकडी गणपती म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध झाले.

lakdi ganpati
जळगावातील लाकडी गणपती
  • श्रद्धा वाढली तशी भाविकांची गर्दीही वाढली-

लाकडी गणपतीविषयी सविस्तर माहिती देताना मंदिराची देखभाल करणारे अशोक भाटिया यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, या ठिकाणाला लाकडी गणपती म्हणून नावलौकिक प्राप्त झाल्यानंतर मधू नेवे नामक स्थानिक भाविकाने गणपतीचा आकार असलेल्या झाडाच्या ढोलीला शेंदूर वगैरे लावून नित्यनेमाने पूजापाठ सुरू केला. मग चतुर्थीला याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ लागली. पुढे पुढे नवस मानायला, नवस फेडायला येणाऱ्यांची संख्याही वाढतच गेली. हे पाहून आमचे बंधू जमनालाल भाटिया यांनी याठिकाणी गणपतीची विलोभनीय मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नंतर याठिकाणी मंदिर आकारास आले. आज हेच मंदिर लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी आम्ही देखभाल करतो, असे अशोक भाटिया यांनी सांगितले.

  • स्थानिकांनी केला होता महापालिकेला विरोध-

काही वर्षांपूर्वी लाकडी गणपती असलेले झाड पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली होती. पण हे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला मोठा विरोध केला होता. म्हणून महापालिकेने फक्त झाडाचा वरचा भाग काढून घेतला होता. मात्र, गणपतीचा आकार असलेला भाग तसाच ठेवला होता. त्यानंतर आजतागायत हे मंदिर कायम असून, भाविक दररोज दर्शनासाठी येतात, अशी आठवण देखील अशोक भाटिया यांनी सांगितली.

  • अनेकांचे नवस झाले पूर्ण-

लाकडी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी राज्यच नव्हे तर इतर ठिकाणचे भाविक देखील नवस करायला, फेडायला येत असतात. अनेकांचे नवस पूर्ण झाले आहेत, असे सांगताना अशोक भाटिया यांनी, 'मलाही काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. पण माझी लाकडी गणपतीवर श्रद्धा आहे. गणरायाच्या कृपेमुळेच मी पूर्णपणे बरा झालो', अशी भावना बोलून दाखवली.

हेही वाचा - शिल्पकलेने नटलेले पुण्यातील 'त्रिशुंड गणपती मंदिर'; जाणून घ्या इतिहास

Last Updated : Sep 14, 2021, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.