जळगाव - जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने रविवारी दुपारनंतर हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उघडण्यात आले होते. त्यातून ९३६.०० क्युमेक इतक्या वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्या विसर्गात आता वाढ करण्यात आली आहे.
रविवारी रात्रीनंतरही जळगाव जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशात पावसाचा जोर कायम राहिल्याने, हतनूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी धरणाचे १४ दरवाजे पूर्ण, तर २२ दरवाजे १ मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून १ हजार ७७९ क्युमेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, तापी नदीपात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.