ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे जिम मालक, ट्रेनर्स लोकांवर उपासमारीची वेळ!

author img

By

Published : Aug 19, 2020, 6:53 PM IST

Updated : Aug 19, 2020, 7:13 PM IST

लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. जिम बंद असल्या तरी इलेक्ट्रॉनिक साधने व मशिनरीची देखभाल-दुरुस्ती करणे, लाईटबिल, जागेचे भाडे यासह इतर खर्च मात्र सुरुच आहे. व्यवसाय बंद असला तरी हा खर्च करावाच लागत आहे. एकीकडे हा खर्च होत असताना दुसरीकडे, घर चालवणे, विविध कर्जाचे हप्ते देखील नियमितपणे भरावे लागत आहेत, असे दीपक राजपूत यांनी सांगितले.

gym owners facing problems
जळगाव जिममालक संकटात

जळगाव- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. त्यामुळे जिम मालक आणि ट्रेनर्स लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुढे अजून किती दिवस अशी परिस्थिती कायम राहील, हे स्पष्ट नसल्याने जिम मालक आणि ट्रेनर्स अक्षरशः हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने शॉपिंग मॉल्स, कॉप्लेक्स तसेच सलून व्यवसायाला ज्याप्रमाणे नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे, त्याच धर्तीवर जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे जिम मालक,ट्रेनर्स अडचणीत

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय आणि आस्थापना बंद ठेवण्यात आले. आता देशभरात हळूहळू 'अनलॉक'ला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने खबरदारीचे उपाय योजून जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने जिम सुरु करण्यासंदर्भात अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. यामुळे जिम मालक, ट्रेनर तसेच जिममध्ये काम करणारे इतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. जळगाव शहरात लहानमोठ्या 20 ते 25 जिम आहेत. प्रत्येक जिममध्ये ट्रेनर्स, इलेक्ट्रिकमन, हाऊस किपिंग असा किमान 20 ते 22 जणांचा स्टाफ आहे. सर्व जिममध्ये काम करणाऱ्या लोकांचा विचार केला तर जळगावातील एक ते दीड हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह जिम व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या 4 महिन्यांपासून जिम बंद असल्याने या सर्व कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिम बंद असल्याने दर महिन्याकाठी होणारी जळगावातील लाखो रुपयांची उलाढाल देखील ठप्प झाली आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. त्यामुळे आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिम बंद असल्या तरी इलेक्ट्रॉनिक साधने व मशिनरीची देखभाल-दुरुस्ती करणे, लाईटबिल, जागेचे भाडे यासह इतर खर्च मात्र सुरुच आहे. व्यवसाय बंद असला तरी हा खर्च करावाच लागत आहे. एकीकडे हा खर्च होत असताना दुसरीकडे, घर चालवणे, विविध कर्जाचे हप्ते देखील नियमितपणे भरावे लागत आहेत. हे करत असताना आम्हाला खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे, असे जळगावातील तळवलकर्स जिमचे व्यवस्थापक दीपक राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने सलून व्यवसायाप्रमाणे जिम व्यवसायाला देखील 'फिजिकल डिस्टन्सिंग' तसेच खबरदारीच्या इतर उपाययोजनांची सक्ती करत परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी दीपक राजपूत यांनी केली. कोरोनावर सध्या परिणामकारक लस किंवा औषधी उपलब्ध नाही. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे व ती टिकवून ठेवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येकाने व्यायाम करण्याची गरज आहे. जिम सुरू झाल्या तर नागरिक व्यायामाला लागतील. परिणामी कोरोनाला लढा देता येईल, असा विश्वास देखील राजपूत यांनी व्यक्त केला.

ट्रेनर्स लोकांपुढेही उभे राहिले संकट-

जिम बंद असल्याने ट्रेनर्स लोकांपुढेही मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या 4 महिन्यांपासून जिम बंद असल्याने ते कुटुंबाचा उदरनिर्वाह तर करु शकत नाहीत. ट्रेनर्सचा फिटनेस राखण्यासाठी महागडी सप्लिमेंट, प्रोटिनची औषधे तसेच दररोज लागणारा महागडा खुराक घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या फिटनेसवर परिणाम होऊन करिअर धोक्यात येण्याची भीती आहे. जिम बंद असल्याने आमच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फिटनेस क्षेत्रात करिअर करण्यासाठी महागडे कोर्सेस आम्ही केलेले आहेत. कोर्स केल्यानंतर आता कुठे करिअर सुरु होत होते. मात्र, कोरोना आला आणि सर्व काही विस्कळीत झाले, असे ट्रेनर सना उल्ला खान तसेच शिवा सुरवाडे यांनी सांगितले. घरखर्च चालवणे, फिटनेससाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च करणे शक्य जिम बंद असल्याने शक्य नाही. सलग 4 महिने जिम बंद असल्याने हतबल झालो आहे. या परिस्थितीत मिळेल ते दुसरे काम करणे भाग पडले, अशी खंत दोघांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

जिम बंद, मिळेल ते काम करण्याची आली वेळ-

कोरोनामुळे जिम बंद असल्याने जिममध्ये काम करणारे ट्रेनर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांवर मिळेल ते दुसरे काम करण्याची वेळ आली आहे. जिम बंद असल्याने ट्रेनर सना उल्ला खान जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एका एजंटकडे कामाला लागला आहे. त्याला दिवसाकाठी 150 ते 200 रुपये मिळतात. त्यावर कसाबसा खर्च भागत असल्याचे तो म्हणाला. ट्रेनर शिवा सुरवाडे याची तर परिस्थिती सना याच्यापेक्षाही वाईट आहे. महिनाभरापासून तो शेंगदाणे-फुटाणे विक्री करू लागला आहे. घरात तो एकटा कमवता व्यक्ती आहे. त्याच्यावर घराच्या उदरनिर्वाहाची पूर्ण जबाबदारी आहे. राज्य सरकारने जिम सुरु करण्यास परवानगी दिली पाहिजे, अशी अपेक्षा शिवा सुरवाडे याने व्यक्त केली.

दरम्यान, तळवलकर्स जिममध्ये हाऊस किपिंगचे काम करणारा किरण शिरसाठ हा कर्मचारी तर जिम बंद असल्याने बांधकाम साईटवर मजूर म्हणून कामाला जात आहे. जळगावात तो कुटुंबीयांसोबत भाड्याच्या खोलीत राहतो. 4 महिन्यांपासून जिम बंद असल्याने त्याचे घरचे भाडे थकले आहे. घरात एकटा कमवता असल्याने त्याला बांधकाम साईटवर कामाला जाणे भाग पडले आहे. जिम लवकर सुरू झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यानेही केली.

Last Updated : Aug 19, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.