ETV Bharat / state

माणूस आशावादी असतो, गुलाबराव पाटलांचा जयंत पाटलांवर निशाणा

मलाही वाटायचे की मी मंत्री व्हावे, लाल दिव्याच्या गाडीत फिरावे. झालो ना मी मंत्री, प्रत्येक माणूस हा आशावादी असतो, आशा कुणाला नसते? अशा शब्दात शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना चिमटा काढला आहे.

author img

By

Published : Jan 22, 2021, 4:03 PM IST

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव - मलाही वाटायचे की मी मंत्री व्हावे, लाल दिव्याच्या गाडीत फिरावे. झालो ना मी मंत्री, प्रत्येक माणूस हा आशावादी असतो, आशा कुणाला नसते? अशा शब्दात शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना चिमटा काढला आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक माणूस हा आशावादी असतो. आशा कुणाला नसते, असे त्यांनी सांगितले. जयंत पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावा करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही तीनही पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. जोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, तोपर्यंत मुख्यमंत्रीपद हिसकावून घेण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री कोण आहे, यापेक्षा आम्ही सामूहिक जबाबदारीने काम करत आहोत. त्यामुळे सर्वच मुख्यमंत्री आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

काय म्हटले होते जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. राजकारणात दीर्घकाळ काम केले की प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असते. परंतु, आमच्यासाठी शरद पवारांचा आदेश अंतिम असतो, असे जयंत पाटील म्हणाले होते. पाटील यांनी व्यक्त केलेल्या सुप्त इच्छेवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

गुलाबराव पाटलांचा जयंत पाटलांवर निशाणा

'ठाकरे एक आहेत आणि राहतील'

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ठाकरे हे एक आहेत आणि यापुढेही कायम राहतील. दोघांचे राजकीय विचार वेगळे असले तरी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नाळ आहे. बाळासाहेबांच्या सहवासात ते घडले असल्याचेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.