जळगाव- सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी ...आली की टाकली पुडी ...कोविड सेंटर हे कमाईचे साधन ( COVID center corruption allegations ) आहे का? असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते किरिट सोमैय्या यांच्या आरोपाचा समाचार ( Gulabrao Patil slammed Kirit Somaiya ) घेतला.
भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पुढच्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा ( Corruption in COVID 19 center ) उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचे कमाईचे साधन असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला होता. त्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी किरीट सोमैय्या यांच्यावर टीका केली आहे.
सोमैय्यांनी देवाला साकडे घालावे-
पालकमंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, की कोरोनावरून काहीही बोलायचे. काहीही आरोप करायचे असा सध्या प्रकार सुरू आहे. किरीट सोमैय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे हे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय हे कमाईच साधन आहे का? सेवाभावी वृत्तीने लोक कोरोनाच्या काळात सरकारला मदत करत आहेत. हे कमाईचे साधन आहे का? असे प्रश्न उपस्थित करत किरीट सोमैय्यांनी बोलताना भान ठेवावे, असा टोला मंत्री पाटील ( Jalgaon guardian Minister slammed Kirit Somaiya ) यांनी लगावला. किरीट सोमैय्यांनी कोरोनाला जाऊ दे, म्हणून देवाला साकडे घालावे, असा टोलाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला.
- ठाकरेंची आलिबाबा चाळीस चोरांची टीम -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आलिबाबा चाळीस चोरांची टीम असल्याची टीका किरीट सोमैय्या यांनी डिसेंबर 2021 मध्ये केली होती. सगळ्या चाळीस चोरांना रोज स्वप्नांत त्यांनी लूट केलेल्या मालाचा हिशोब कोणी घेण्यासाठी घरी येणार का, याची भीती वाटत असेल. ज्यांनी चोरी आणि लबाडी केली आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचेही सोमैया म्हणाले होते.